शासनकर्ते गोवंश हत्याबंदी कायद्याची परिणामकारक कार्यवाही केव्हा करणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
हिंगोली : येथील वाशिम रस्त्यावर ट्रकमध्ये कत्तलीसाठी गोवंशियांची वाहतूक करत असतांना तीस गोवंशियांचा गुदमरून आणि उपासमारीने मृत्यू झाल्याची घटना घडली. मध्यप्रदेशातून भाग्यनगर येथे हे गोवंश कत्तलीसाठी नेण्यात येत होते. पोलिसांना याविषयी माहिती मिळाल्यानंतर ट्रक रोखण्यात आला. ट्रकमध्ये सर्व गोवंशियांना कोंबून भरण्यात आले होते.
पोलिसांनी ट्रक पकडला असता सामानाच्या गाठोड्यासारखे गोवंश एकावर एक असे कोंबले होते. या गोवंशियांचे पाय आणि तोंड बांधले होते. काही जनावरे अर्धमृतावस्थेतही साडपली. एकूण २४ गोवंशीय घायाळ झाले आहेत. पोलिसांनी ट्रक कह्यात घेतल्यावर ट्रकचा चालक आणि साहाय्यक पसार झाले आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
0 Comments