हिंदूंची असुरक्षित मंदिरे !
धर्मशिक्षणाअभावी हिंदूंच्या मंदिरांत भ्रष्टाचार होतात ! हे रोखण्यासाठी सर्व मंदिरात भाविक पुजारी आणि विश्वस्तांची नेमणूक होणे आवश्यक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
सोलापूर : केवळ चार वर्षांत २५० तोळे (अडीच किलो) सोने बेपत्ता झाल्याचे आणि वर्ष १९६० पासून मंदिरातील दानपेटीतील रकमेचा हिशोब नसल्याचे उघड झाले आहे. येथील श्री यमाईदेवी देवस्थान ट्रस्टमधील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याच्या चौकशीचा अहवाल तीन महिन्यांपूर्वी धर्मादाय आयुक्तांना देण्यात आला आहे; मात्र त्या प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
येथील श्री यमाई मंदिरातील ट्रस्टने अपहार केल्याची तक्रार धर्मादाय आयुक्तांकडे केली होती. ८० तोळे सोन्यासह अन्य मौल्यवान वस्तू बेपत्ता झाल्याचे तक्रारीत म्हटले होते.
चौकशीत ट्रस्टकडील चार वर्षांच्या नोंदी तपासण्यात आल्या. १९६० पासूनच्या दानपेटीच्या रकमेचा हिशोब नसल्याने उर्वरित कालावधीचा हिशोब केल्यास हा आकडा कोटीच्या पुढे जाईल. अहवाल न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत संबंधित अधिकार्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. सध्या अस्तित्वात असलेले ट्रस्ट बरखास्त करून नवा न्यास सिद्ध करण्याची शिफारस अहवालात करण्यात आल्याचे समजते. त्यामध्ये गावातील सर्व घटकांना प्रतिनिधीत्व देण्याची सूचनाही करण्यात आली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात