Menu Close

केरळमध्ये आणखी एका संघ कार्यकर्त्याची निर्घृण हत्या

केरळमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजू देणारे कम्युनिस्टांचे सरकार जनता केव्हा विसर्जित करणार ? मुसलमानांच्या कथित हत्या झाल्यावर अहिष्णुता वाढल्याची ओरड करणारे पुरोगामी, निधर्मी हे केरळमधील संघाच्या कार्यकर्त्यांच्या हत्यांवर गप्प का बसतात ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

मलप्पुरम् (केरळ) : इस्लाम स्वीकारलेल्या एका हिंदूच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता बिपीन (वय २६ वर्षे) याची २४ ऑगस्टला सकाळी मल्लपुरममधील तिरूर येथे अज्ञातांनी निर्घृण हत्या केली. सकाळी ७ वाजता तो दुचाकीवरून जात असतांना त्याला आक्रमणकर्त्यांनी पकडले आणि मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला.

बिपीन याच्यावर ३० वर्षीय फैझल पुलानी (इस्लाम धर्म स्वीकारण्याआधीचे नाव अनीश कुमार) याची नोव्हेंबर २०१६ मध्ये हत्या केल्याचा आरोप होता. फैझलच्या हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी संघ परिवारशी संलग्न असलेल्या १६ जणांना अटक केली होती. त्यात फैझलचा मेहुणा विनोद पुलानी याचाही समावेश आहे. बिपीनला एप्रिलमध्ये जामिनावर सोडण्यात आले होते.

बिपीनच्या हत्येनंतर तिरूर भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. भाजपचे मलप्पुरम् जिल्हा महासचिव रवी थेलात यांनी सांगितले की, बिपीनच्या हत्येचा कट पद्धतशीरपणे रचला गेला आहे. या हत्येची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. भाजपने तिरूर बंद आंदोलन केले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *