मेरठ (उत्तरप्रदेश) – तीन वेळा तलाक म्हणत दिलेल्या तोंडी तलाकवर सर्वोच्च न्यायालयाने ६ मासांसाठी बंदी घातली असतांना मेरठमध्ये तोंडी तलाकची घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनेतील पीडित महिला अरशी खान हिचा हुंड्यासाठी सासरकडून छळ केला जात होता. तिला २१ ऑगस्टला घरातून बाहेरही काढण्यात आले होते. यानंतर समस्या सोडवण्यासाठी दोन्ही परिवारांत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी सर्वोच्च न्यायालयाचा तोंडी तलाकविषयी आलेला निकाल पीडित महिलेने तिचा पती सिराज खान याला सांगितल्यावर त्याने तिला तेथेच तोंडी तलाक दिला. (यावरून मुसलमान भारताचे कायदे जुमानत नाहीत, हेच दिसून येते ! अशांना देशात रहाण्याचा काय अधिकार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) यानंतर अरशी खान हिने पोलिसांत तक्रार केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात