मुंबई – हिंदु देवतांची नावे ही कोणाची मक्तेदारी नाही; परंतु व्यापार चिन्ह म्हणूनही त्यावर कुणाला तसा दावा करण्यास अनुमती दिली जाऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
फ्रुडेनबर्ग गाला हाऊसहोल्ड प्रॉडक्ट प्रा.लि. आणि जीईबीआय प्रॉडक्ट्स या आस्थापनांमध्ये झाडूच्या लक्ष्मी आणि महालक्ष्मी नावावरून वाद चालू होता; मात्र हिंदु देवतांची नावे ही कुणाची मक्तेदारी नाही किंवा कुणी त्यावर आपला दावाही सांगू शकत नाही, हा जीईबीआय प्रॉडक्ट्सचा दावा न्यायालयाने मान्य केला आहे आणि फ्रुडेनबर्ग गाला हाऊसहोल्ड प्रॉडक्ट
प्रा. लि.चा दावा फेटाळून लावला आहे. लेबल मार्कवर दावा करणे आणि त्याचे संरक्षण करणे अन् एखाद्या सर्वसामान्य नावावर मक्तेदारी करणे ही दोन सूत्रे वेगवेगळी आहेत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
जीईबीआय या आस्थापनाने आपल्या उत्पादनाचे नाव हेतूत: वापरल्याचा आरोप करीत फ्रुडेनबर्ग गाला हाऊसहोल्ड प्रॉडक्ट प्रा. लि. ने त्याच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती अन् जीईबीआयला उत्पादनासाठी महालक्ष्मी नावाचा वापर करण्यापासून बंदी करण्याची विनंती केली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात