हा मुंबईच्या सहपोलीस आयुक्तांचा आदेश आहे कि मौलवीचा फतवा ?
- राज्यात गोहत्याबंदी कायदा असतांना त्याची कार्यवाही करण्याऐवजी गोहत्येला प्रोत्साहन देणारा मुंबईच्या सहपोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा हिंदुद्वेषी आदेश !
- पोलिसांचे असे खच्चीकरण केल्यावर एक तरी पोलीस त्याचे कर्तव्य निभावेल काय ? यातून सरकार एक प्रकारे गोहत्याबंदीच्या कायद्याचे उल्लंघनच करायला सांगत नाही काय ? शासनाने अशा पोलिसांवर कारवाई करणे अपेक्षित आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मुंबई : जनावरांची अनधिकृत वाहतूक करणार्यांवर कारवाईची नोटीस काढून कर्तव्य बजावण्यासाठी पोलिसांना प्रोत्साहन देण्याऐवजी मुंबईचे वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ईदनिमित्त जनावरांची वाहतूक करणार्या वाहनांची अडवणूक करू नये, अशी पोलिसांनाच तंबी दिली आहे. अशा प्रकारची कोणती तक्रार आल्यास संबंधित पोलिसांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणीही देण्यात आली आहे. यासाठी २६ ऑगस्ट या दिवशी खास परिपत्रक काढण्यात आले आहे. या कालावधीत जनावरांची वाहतूक करणार्या वाहनांच्या कागदपत्राचीही पोलिसांनी तपासणी करून नये, असा आदेश त्यांनी दिला आहे. (ईदच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात गोहत्या होते, हे सर्वश्रुत आहे. असे असतांना खरे तर गोहत्या आणि जनावरांची अनधिकृत वाहतूक रोखण्यासाठी सहपोलीस आयुक्तांनी परिपत्रक काढायला हवे. एखाद्या मुल्ला-मौलवी यांच्या फतव्याप्रमाणेच हे परिपत्रक नव्हे काय ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
या परिपत्रकात म्हटले आहे की,
१. मुंबईतील देवनार येथील पशूवधगृहामध्ये बकरी ईदनिमित्त महाराष्ट्रातून, तसेच अन्य राज्यांतून जनावरे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येतात. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जाऊन कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
२. दिलेल्या आदेशाचे वाहतूक शाखेतील सर्व अधिकारी आणि अंमलदार यांच्याकडून काटेकोरपणे पालन केले जाईल, याची सर्व संबंधित पोलीस उपायुक्त आणि साहाय्यक पोलीस आयुक्त, वाहतूक यांनी नोंद घ्यावी, असे यात पुढे म्हटले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात