Menu Close

‘बंपर डॉट कॉम’च्या विज्ञापनामधून श्री गणेशाचे विडंबन

केंद्र सरकार हिंदूंच्या श्रद्धास्थानांच्या अवमानाविषयी कठोर कारवाई करणारा कायदा कधी करणार ?


बेंगळुरू : गाड्यांचे सुटे भाग पालटणे आणि गाड्यांवरील ओरखडे दूर करून मूळ स्वरूप देण्यासाठी कार्यरत असणार्‍या बंपर डॉट कॉमच्या फेसबूक आणि ट्वीटर यांवर एक विज्ञापन प्रसिद्ध करण्यात आले आहे. श्री गणेशचतुर्थीनिमित्त सूट देण्याविषयीच्या या विज्ञापनातून श्री गणेशाचे विडंबन करण्यात आले आहे. यात श्री गणेशाच्या चित्रातील हातामध्ये बंपर डॉट कॉमचे भ्रमणभाष अ‍ॅप दाखवण्यात आले असून श्री गणेशाचे वाहन असणार्‍या मूषकावर ओरखडे आले असल्याचे दाखवण्यात आले आहे. यात श्री गणेश लोकांना बंपर डॉट कॉमचा वापर करावा, असे म्हणत आहेत. आम्ही तुमचे वाहन ठीक करून देऊ, असे येथे लिहिण्यात आले आहे.  या विज्ञापनास हिंदूंकडून विरोध केला जात आहे. हिंदु जनजागृती समितीने हे विज्ञापन हटवण्याची मागणी केली आहे.

धर्माभिमानी हिंदू पुढील संपर्कावर निषेध नोंदवत आहेत.

इमेल : [email protected]
दू.क्र. : ०९१०८४४६५८६
ट्विटर : twitter.com/HitBumper
फेसबूक : facebook.com/hitbumper/

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *