विदेशी लोक हे भारतीय संस्कृतीकडे आकर्षित होत असतांना भारतीय मात्र पाश्चात्त्य संस्कृती अंगिकारतात, हे लज्जास्पद ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
हरिद्वार : भारतातील ब्रिटनचे उच्चायुक्त सर डोमिनिक एस्थी यांनी त्यांच्या पत्नी लुईस यांच्यासह येथील देव संस्कृती विद्यापिठाला वैयक्तिक भेट दिली. यानिमित्त विद्यापिठातील सभागृहात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यापिठाचे प्रतिकुलपती डॉ. चिन्मय पण्ड्या यांनी सर डोमिनिक एस्थी यांना विद्यापीठ आणि शांतीकुंज परिवार यांच्या वतीने आध्यात्मिक साहित्य भेट दिले. डोमिनिक यांनी या भेटीला ऐतिहासिक म्हटले, तसेच शिक्षण आणि संस्कृती यांच्यासाठी विद्यापिठाकडून करण्यात येत असलेल्या कार्याचे कौतुक केले. उच्चायुक्त विद्यापिठात केवळ १५ मिनिटे थांबणार होते परंतु; ते तेथील वातावरणाने प्रभावित होऊन त्यांनी तेथे ३ घंटे व्यतीत केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात