-
३ गणेशोत्सव मंडळांंच्या २९ जणांच्या विरोधात गुन्हे नोंद
-
कोल्हापूर येथे श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी मिरवणुकीत डॉल्बी यंत्रणा लावल्याचे प्रकरण
-
२ घंट्यांहून अधिक काळ मिरवणूक बंद पोलिसांचा सौम्य लाठीमार
सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीप्रदूषणाविषयी दिवसांतून ५ वेळा बांग देणार्या मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधातही कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. याची माहिती पोलिसांना आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी वारंवार निवेदन देऊनही पोलीस यंत्रणा कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात काहीही कारवाई न करता केवळ गणेशोत्सव मंडळांवर कारवाई करून हिंदूंवर मर्दुमकी गाजवतात, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
कोल्हापूर : गणेशोत्सव मंडळांनी डॉल्बी यंत्रणा लावू नये, असे पोलीस यंत्रणेने वारंवार सांगूनही २५ ऑगस्टला श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी राजारामपुरी येथे ३ गणेशोत्सव मंडळांनी डॉल्बी यंत्रणा चालू करून मिरवणूक काढली. पोलिसांनी या मिरवणुका अडवल्या. त्यामुळे मिरवणूक २ घंट्यांहून अधिक काळ बंद राहिली. शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर आणि आमदार सतेज पाटील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; मात्र गणेशोत्सव मंडळ डॉल्बी यंत्रणा लावण्याच्या भूमिकेशी, तर पोलीस डॉल्बी न लावण्याच्या भूमिकेशी ठाम राहिले. रात्री १२ वाजल्यानंतर रस्त्यात थांबलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सौम्य लाठीमार करून पांगवले. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते संतप्त झाले. राजारामुपरी येथे १ दिवस तणावाचे वातावरण होते, तसेच डॉल्बी यंत्रणा लावल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी २६ ऑगस्टला ३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्यांसह २९ जणांच्या विरोधात गुन्हे नोंद केले आहेत. (धर्मशास्त्रानुसार पारंपरिक वाद्ये वाजवून श्री गणेशाचा नामजप करत मिरवणूक काढणे योग्य आहे. शास्त्राच्या विरोधात डॉल्बीसारखी ध्वनीप्रदूषण करणारी वाद्ये वाजवून मिरवणुका काढल्यामुळे इतरांना त्रास होतो. त्यामुळे अनेकांच्या मनात नको तो उत्सव अशी भावना निर्माण होते. आदर्श पद्धतीने भक्तीभावपूर्वक मिरवणूक काढल्यास श्री गणेशाची कृपा संपादन करू शकतो ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१. पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी पोलिसांच्या फौजफाट्यांसह मंडळात घुसून डॉल्बीचे मिक्सर जप्त केले.
२. न्यायालयाच्या आदेशानुसार अल्प डेसिबलमध्ये मंडळांनी यंत्रणा लावण्यास काय हरकत आहे, अशी भूमिका श्री. क्षीरसागर यांनी मांडली. त्यावर अमृतकर यांनी आवाज ठरलेल्या क्षमतेच्या बाहेर जात असल्याने डॉल्बी यंत्रणा लावायची नाही, असे सांगितले.
३. शिवसैनिक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी या वेळी येथे आरती चालू केली.
४. कोणत्याही कार्यकर्त्याला मारहाण करू नका. सर्वच ठिकाणी पोलिसांनी ही भूमिका घ्यावी. केवळ गणेशोत्सवात नको, असे हिंदुत्वनिष्ठ श्री. उरसाल यांनी पोलिसांना सुनावले.
५. तालीम मंडळ (आर्.टी.ग्रुप), एकता ग्रुप राजारामपुरी (तिसरी गल्ली) आणि चॅलेंज ग्रुप (व्ही बॉईज) यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात आले. डॉल्बी मालक, ऑपरेटर, टॅक्टर, ट्रॉली मालक आणि चालक यांचा शोध घेऊन आणखी १५ संशयितांवर गुन्हे नोंद करण्यात येत आहेत.(अशी सडेतोड भूमिका अन्य धर्मियांच्या विषयी पोलीस घेतात का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात