हिंदूंच्या मंदिरांवर पाकचा राष्ट्रध्वज लावणारे देशद्रोही असल्याने त्यांना देशातून हाकलून दिले पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नरसिंहपूर (मध्यप्रदेश) – नरसिंहपूर शहरापासून दूर एका गावात पंचमुखी हनुमानाच्या मंदिराच्या छतावर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज लावण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याची माहिती मिळाल्यानंतर मंदिर समितीच्या सदस्यांनी हा ध्वज काढून टाकला, तसेच पोलिसांत तक्रार केली.
यानंतर पोलिसांनी येथे तणाव निर्माण होऊ नये म्हणून कलम १४४ लागू केले आहे. तसेच सामाजिक माध्यमातून याचा प्रसार करण्यावरही बंदी घातली आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी आंदोलन चालू केले. मंदिराचा सीसीटीव्ही कॅमेरा नादरुस्त असल्याने आरोपींचे चित्रीकरण करता आले नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात