Menu Close

हिंदुबहुल भागात मुसलमानांना घरे घेण्यावर रोख लागण्यासाठी संवेदनशील क्षेत्र अधिनियम लागू करा !

  • गुजरातमध्ये मुसलमानांवर अत्याचार केला जातो, हे खोटे ठरवणारी घटना !

  • गुजरातमधील भाजपच्या आमदार संगीता पाटील यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

सूरत (गुजरात) : भाजपच्या येथील लिम्बयात भागाच्या आमदार संगीता पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र लिहून या भागात संवेदनशील क्षेत्र अधिनियम लागू करण्याची मागणी केली आहे. येथे मुसलमान घरे विकत घेऊन त्यांचे प्राबल्य वाढवत आहेत आणि त्यामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने मुसलमानांना येथे घरे विकत घेण्यावर रोख लागण्यासाठी त्यांनी ही मागणी केली आहे. (लॅण्ड जिहादद्वारे हिंदूंवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणार्‍यांना चाप बसण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

पाटील यांनी पुढे लिहिले आहे की, मुसलमान हिंदूंच्या वसाहतीत घरे घेण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवतात, तसेच हिंदूंना धमकवतात. त्यांना घर विकण्यास बाध्य करतात. पूर्वी हा भाग हिंदुबहुल होता. येथील काही वसाहती पूर्वी हिंदुबहुल होत्या; मात्र आता तेथे मुसलमानांची संख्या वाढली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *