नवी देहली – भगवान रामाचा एक-एक बाण म्हणजे क्षेपणास्त्र होते. रामाने लोकांची सुटका करण्यासाठी त्याचा वापर केला होता. रामाने बनवलेला सेतू चर्चेचा विषय आहे. यावरून ते कोणत्या स्तराचे अभियंता होते याची कल्पना करता येऊ शकते, असे विधान गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी केले. ते ‘इन्स्टिट्यूट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी रिसर्च अॅण्ड मॅनेजमेंट’च्या (‘आयआयटीआर्एएम्’च्या) एका कार्यक्रमात बोलत होते.
रूपानी पुढे म्हणाले की, रामायणात लक्ष्मण बेशुद्ध झाल्यानंतर ‘उत्तर भारतात सापडणार्या एका वनौषधीने त्यांची प्रकृती सुधरू शकते’, असे समजले; पण कोणती वनौषधी आणायची आहे, हे हनुमान विसरले आणि त्यांनी संपूर्ण पर्वत उचलून आणला होता. त्या वेळी असे कोणते तंत्रज्ञान होते जे पर्वत उचलायला साहाय्य करू शकेल ?, असा प्रश्न त्यांनी विचारला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात