नागपूर : भारतीय संस्कृतीविषयी खोटी तसेच अवमानकारक माहिती देणारा आणि विद्यार्थ्यांच्या मनात हिंदुद्वेष निर्माण करणारा ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ चा इयत्ता ७ वी, १० वी आणि १२ वीचा अभ्यासक्रम त्वरित पालटण्यात यावा आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या ‘मुळा-प्रवरा इलेक्ट्रीकल को-ऑ. सोसायटी’कडून वीज देयकाचे येणे बाकी असलेले २ सहस्र कोटी रुपये वसूल करून दुष्काळग्रस्त शेतकर्यांसाठी साहाय्य म्हणून देण्यात यावे, अशा मागण्यांचे निवेदन सहकार राज्यमंत्री श्री. दादा भुसे यांना देण्यात आले. तेव्हा या दोन्ही प्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात