पीएफ्आय, एस्डीपीआय आणि मार्काजुल हिदाया या धर्मांध संघटनांचा सहभाग
नवी देहली : केरळमधील लव्ह जिहादच्या एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने अन्वेषण करत असलेल्या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला (‘एन्आयए’ला) काही पुरावे हाती लागले आहेत. या प्रकरणातील हिंदु मुलगी अखिला हिचे धर्मांतर करून तिच्याशी विवाह करणार्या शफीन या मुसलमान तरुणाचे धर्मांध संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी (पीएफ्आयशी) संबंध आहेत, अशी माहिती एन्आयएला मिळाली आहे. मुलीच्या वडिलांनी शफीनचे इसिसशी संबंध असल्याचा आरोप केला होता.
१. एन्आयएच्या चौकशीत माहिती मिळाली आहे की, अखिला अशोकन् हिला इस्लाम शिकवणारी शिक्षिका आणि पीएफ्आयच्या महिला शाखेची अध्यक्षा सायनाबा हिनेच तिचे ‘ब्रेन वॉश’ करून शफीन याला तिच्याशी विवाह करण्यास साहाय्य केले. यामुळे तिचे धर्मांतर करणे सोपे झाले. सायनाबा हिचे पीएफ्आय, एस्डीपीआय आणि मार्काजुल हिदाया या इस्लामी संघटनांशी संबंध आहेत.
२. अथिरा नांबियार हिच्या लव्ह जिहादच्या प्रकरणातही सायनाबा हिनेच तिचे ‘ब्रेन वॉश’ करून तिला धर्मांतर करण्यास भाग पाडले होते. या प्रकरणात महंमद कुट्टी (पीएफ्आय-एस्डीपीआय सदस्य) याने एन्आयएच्या चौकशीत मान्य केले की, अथिरा आणि अखिला यांना त्यांच्या आई-वडिलांपासून दूर ठेवण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. वर्ष २०१६ मध्ये पालकांना आणि पोलिसांना फसवण्यासाठी या दोघींकडून पत्रेही पाठवण्यात आली होती. यात लिहिले होते की, मी स्वेच्छेने इस्लाम स्वीकारत आहे. यात विशेष म्हणजे प्रत्येक पत्रामध्ये तिच्या नावाचा उच्चार वेगवेगळा होता. एन्आयएच्या मते ही पत्रे या मुलींनी लिहिलेलीच नाहीत.
३. एन्आयच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर पीएफ्आयने बलपूर्वक अखिलाचे धर्मांतर केल्याचे वृत्त फेटाळले आहे. त्यांचा प्रवक्ता शफीक रहमानने म्हटले आहे की, अखिला हिने तिच्या महाविद्यालयातील मित्रांना पाहून इस्लाम स्वीकारला आहे.
४. शफीन याच्याशी विवाह करण्यापूर्वी अखिला सायनाबा बरोबर रहात होती. तिने अखिलाच्या पालकांना किंवा केरळ उच्च न्यायालय यांना न कळवताच तिचे लग्न लावून दिले.
५. एन्आयएने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, धर्मांतर आणि विवाह या दोन्ही घटना वेगवेगळ्या नाहीत. पीएफ्आय, एस्डीपीआय आणि सथ्यसारिनी या संघटनांनीच मिळून हा गुन्हा केला आहे.
६. केरळच्या थर्बियातुल इस्लाम सभेने (टीआईएस्ने) २०१६ मध्ये अखिलाचे धर्मांतराचे प्रमाणपत्र दिले होते. २५ जुलै २०१६ मध्ये अखिला हिने इस्लामचा अभ्यास पूर्ण केला होता.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात