कुठे हिंदु धर्मशास्त्रानुसार धार्मिक विधी करणारे पाश्चात्त्य, तर कुठे या विधींना अंधश्रद्धा म्हणणारे भारतातील तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी हिंदू ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
वाराणसी : इटली येथील सारा नावाच्या महिलेने गंगानदीच्या किनारी तिच्या मृत मुलाच्या आत्म्याला शांती लाभावी, यासाठी तुलसी घाटावर अनुष्ठान केल्याची घटना समोर आली आहे. पंडित बेचू महाराज यांनी सांगितले की, मी जेव्हा त्यांच्या मुलासाठी पिंडदान करत होतो, तेव्हा सारा विदेशी नसून भारतीयच आहेत, असेच मला वाटले.
सारा यांनी म्हटले, ‘काशीशी माझा अनेक जन्मापासून संबंध आहे’, असे वाटते. मी माझ्या मुलाच्या आत्म्याच्या शांतीसाठी येथे आले, हे माझे सौभाग्य आहे. माझ्या मुलाला मोक्ष मिळेल, असा मला विश्वास आहे. मला भारतीय संस्कृती आवडते. माझा पुढचा जन्म येथेच व्हावा, असे वाटते. पुढचे काही दिवस भुवनेश्वर येथे ओडिशी नृत्य शिकणार आहे. त्यानंतर मी इटलीला परत जाईन, असे त्यांनी सांगितले.
सारा यांना त्यांच्या मित्रांकडून, तसेच पुस्तकातून काशीच्या महत्त्वाविषयी माहिती मिळाली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात