Menu Close

चेन्नई येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मंदिर स्वच्छता सेवा

मंदिरातील पूजेच्या वस्तू धुतांना सनातनच्या साधिका

चेन्नई : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चेन्नईमधील मिलापूर येथील श्री करणीश्‍वर मंदिरात नुकतीच मंदिर स्वच्छता सेवा करण्यात आली. सनातनच्या स्थानिक साधिका सौ. संगीता बालाजी यांच्या पुढाकाराने सेवेचे नियोजन करण्यात आले. स्वच्छता सेवेमध्ये ६ साधक सहभागी झाले होते.

स्वच्छता सेवेनंतर आयोजित करण्यात आलेल्या सत्संगात हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सुगंधी जयकुमार यांनी ‘श्री गणेशचतुर्थी’ या विषयावर व्याख्यान घेतले. या वेळी साधनेतील शंकांचे निरसन करण्यात आले. काही साधकांनी सेवेच्या वेळी आलेल्या अनुभूती कथन केल्या. स्थानिक साधकांनी या सत्संगाचा लाभ घेतला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *