Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने समाजात स्वसंरक्षणाविषयी जागृती

पुणे/पिंपरी चिंचवड : गणेशोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गणेशोत्सव मंडळे आणि अन्य ठिकाणी ‘शौर्य जागरण मोहीम’ राबवण्यात येत आहे. या मोहिमेला गणेशोत्सव मंडळांचा, तसेच समाजातील युवक-युवतींचा पुष्कळ चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांची मागणीही होत आहे. हिंदूंच्या शौर्याला साद घालणार्‍या या उपक्रमाद्वारे ‘हिंदू तेजा जाग रे’ असे आवाहन करण्यात येत आहे.

काय आहे शौर्य जागरण मोहीम ?

आज समाज अत्यंत असुरक्षित बनला आहे. ठिकठिकाणी बलात्कार, दंगल, आतंकवादी आक्रमणे असे अनेक प्रकार सर्रास घडत आहेत. अशा प्रसंगी अन्य कोणावर अवलंबून न रहाता स्वतःचे रक्षण करता यावे, यासाठी प्रशिक्षित असणे आवश्यक आहे. केवळ शारीरिक बळ नव्हे, तर मानसिक बळ म्हणजेच ‘शौर्य’ जागृत झाल्याने स्वसंरक्षण करण्यासाठी व्यक्ती अधिक सक्षम होते. या मोहिमेत एका नाटिकेद्वारे समाजातील दुःस्थितीमुळे एखादा प्रसंग ओढवल्यावर मनुष्याची स्थिती कशी होते आणि शौर्य जागृत झाल्याने त्या व्यक्तीमध्ये कसा पालट होतो, प्रसंगाचा सामना कसा करायचा ते दाखवण्यात आले आहे.

संस्था आणि समितीच देश आणि समाज घडवण्याचे कार्य तळमळीने करतात ! – श्री. मुकुंद चव्हाण

कसबा पेठेतील अवधुत गणेशोत्सव मंडळात पथनाट्य दाखवण्यात आले. या वेळी ५० हून अधिक युवकांनी हे पथनाट्य पाहिले. त्यानंतर मंडळाचे श्री. मुकुंद चव्हाण म्हणाले, ‘‘केवळ सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती देश आणि समाज घडवण्याचे कार्य तळमळीने करत आहे. मंडळाच्या परिसरातील युवक-युवतींसाठी मी स्वतः प्रशिक्षणवर्गाचे नियोजन करतो.’’ त्यासमवेत गणेशोत्सवाच्या नंतर हिंदुत्वनिष्ठांना साधना आणि हिंदुत्वाच्या कार्याची योग्य दिशा मिळावी याकरिता समितीचे प्रवचनही आयोजित करणार आहे.

‘शौर्य जागरण’ हा समितीचा उत्कृष्ट उपक्रम – श्री. अमोल ढेकणे

श्री. अमोल ढेकणे हे आझाद मित्र मंडळात जिवंत देखावा सादर करणार होते. तत्पूर्वी त्यांनी तेथेच समितीने सादर केलेले पथनाट्य पाहिले. ते पाहून ‘तुम्ही दाखवलेले पथनाट्य पुष्कळ छान आहे. समितीने चालवलेला हा उपक्रम उत्कृष्ट आहे’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी ‘समितीच्या स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गाला नक्की येणार’, असे सांगितले.

वैशिष्ट्यपूर्ण

१. मुळानगर मित्रमंडळ, जुनी सांगवी येथे दाखवलेले पथनाट्य २०० जणांनी पाहिले. त्यानंतर प्रशिक्षणाची आवश्यकता लक्षात घेऊन १५ जणांनी उत्स्फूर्तपणे त्या भागात स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गाची मागणी केली. त्यासह जुनी सांगवी भागातील धर्मशिक्षणवर्गास येण्याचीही सिद्धता काहींनी दर्शवली.

२. प्राधिकरण भागातील स्पाईन सिटी मॉल व्यापारी गणेशोत्सव मंडळ येथे पथनाट्य दाखवण्यात आले. त्यावेळी चाकण आणि आळंदी भागातून मॉलमध्ये आलेल्या काही ग्राहकांनी त्यांच्या सोसायटीतही हे पथनाट्य दाखवण्याची विनंती केली.

३. सेवा मित्र मंडळ, शुक्रवार पेठ येथे पथनाट्य दाखवतांना पाऊस येत असून ही १२ जण पावसात उभे राहून पथनाट्य पहात होते. तेथे महिलांचाही चांगला प्रतिसाद होता.

४. २७ आणि २८ ऑगस्ट या दिवशी ६ ठिकाणी पथनाट्य दाखवण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *