कोल्हापूर येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिका यांना कायदेशीर नोटीस !
धर्मप्रेमी श्री. ज्ञानेश्वर अस्वले यांनी ही नोटीस बजावली असून ‘पर्यावरणाचे रक्षण व्हावे आणि धर्मशास्त्र सुसंगत उत्सव व्हावा, यासाठी कायदेशीर मार्गाने लढा देत आहे’, असे मत श्री. ज्ञानेश्वर अस्वले यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर : प्रदूषण रोखण्याचे दायित्व असतांनाही पुरोगामी संस्थांच्या नादी लागून कोणताही अभ्यास वा संशोधन न करताच कागदी लगद्याच्या मूर्तींना ‘इको-फ्रेंडली’ ठरवण्याचे कारस्थान ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि राज्याचा पर्यावरण विभाग यांनी केल्याचे न्यायालयाच्या निकालातून सिद्ध झाले. निकालानंतर १० मास होऊनही त्यांनी कागदी लगद्याच्या मूर्तींमुळे होणार्या प्रदूषणाविषयी कोणतीही जागृती केली नाही. इतकेच नव्हे, तर यंदाच्या गणेशोत्सवाच्या पूर्वीही त्यांनी कागदी लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन देणे चालू केले आहे. त्यामुळे कागदाच्या लगद्याच्या मूर्तींवर त्वरित बंदी आणली नाही, तर ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि पर्यावरण विभाग यांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका प्रविष्ट करणार असल्याची चेतावणी हिंदु जनजागृती समितीने दिली आहे.
१६ ऑगस्ट या दिवशी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे येथील प्रादेशिक अधिकारी दिलीप खेडेकर आणि महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी यांना हिंदु जनजागृती समितीने कायदेशीर नोटीस बजावली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात