चेन्नई : उत्तर चेन्नईमध्ये शिवसेनेच्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने आयोजितश्री गणेशचतुर्थी उत्सवात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री गणेशचतुर्थी या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. तमिळनाडू शिवसेनेचे अध्यक्ष श्री. जी राधाकृष्णन् यांनी उत्तर चेन्नईच्या मनाली, आंदरकुप्पम्, थिरुवोट्टियुर, सातंगगडु आणि मल्लिकापुरम् येथे सार्वजनिक गणेशोत्सवांचे आयोजन केले होते. या उत्सवांमध्ये हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनायक शानभाग आणि श्री. जयकुमार यांनी श्री गणेशोत्सवाविषयी प्रबोधन केेले.
शिवसेनेचे राज्यस्तरीय पदाधिकारी श्री. करनंजी यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आयोजनामध्ये पुढाकार घेतला. या वेळी भारत हिंदु मुन्नानीचे श्री. आर्.डी. प्रभु आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या उत्सवात हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांचा श्री. राधाकृष्णन्जी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
चेन्नई येथे कौटुंबिक स्नेहमेळाव्यात श्री गणेशचतुर्थीविषयी व्याख्यान
चेन्नई : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील सौ. रागिणी प्रेमनाथ यांच्या कुटुंबियांच्या एका स्नेहमेळाव्यामध्ये श्री गणेशचतुर्थीविषयी व्याख्यान घेण्यात आले. या वेळी समितीचे श्री. जयकुमार यांनी श्री गणपती पूजन आणि त्याचे लाभ, सध्याच्या प्रदूषित वातावरणामध्ये नामजपासह भक्तीभावाने श्री गणेशाची पूजा करण्याचे महत्त्व, योग्य मूर्ती बनवण्याविषयी समाजामध्ये जागृती करण्याचे महत्त्व आदींविषयी माहिती सांगितली. या व्याख्यानाचा अनुमाने ३० जणांनी लाभ घेतला.
क्षणचित्रे : सर्व नातेवाइकांनी लक्षपूर्वक श्री गणपतीविषयीची माहिती जाणून घेतली. त्यांनी प्रथमच श्री गणेशाविषयी एवढी मौल्यवान माहिती मिळाल्याचे सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात