Menu Close

मालेगाव (महाराष्ट्र) : गणपतीची आरती केल्याने चौघांना इस्लाममधून केले होते बहिष्कृत; कलमा वाचल्यानंतर केले माफ

नेहमी हिंदूंना धर्मांध आणि असहिष्णु म्हणून हिणवणारे निधर्मीवादी आता कुठल्या बिळात जाऊन लपले आहेत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

मालेगाव : येथे एकतेचे दर्शन घडवण्यासाठी रमजानपुरा भागात गणरायाची आरती करणार्‍या चौघा मुसलमान तरुणांना २७ ऑगस्टला इस्लाममधून बहिष्कृत करण्यात आलेे. काही मुसलमान धर्मगुरु आणि संघटना यांनी या तरुणांच्या विरोधात फतवा काढला; परंतु चूक मान्य करून कलमा पठण केले, तरच पुन्हा इस्लाम धर्मात घेऊ, असेही त्यांनी म्हटले. त्यानुसार चौघांनी कलमा पठण केले. चूक मान्य केल्यानंतर त्यांना परत इस्लाममध्ये घेण्यात आले. (निवळ आरती केली; म्हणून स्वधर्मातील तरुणांच्या विरोधात कठोर भूमिका घेणारे कट्टरवादी मुसलमान ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

१. रमजानपुरा या हिंदु-मुसलमान वस्तीत एका मंडळाने श्री गणरायाची स्थापना केली आहे. दोन्ही धर्माचे नागरिक येथे रहातात. येथील मंडळात १२ सदस्य हे मुसलमान आहेत. मंडळास अनेक मुसलमान कुटुंबियांनी वर्गणी दिली आहे. या मंडळाने हिंदु-मुसलमान बांधवांच्या उपस्थितीत आरतीचे आयोजन केले होते.

२. चार मुसलमान तरुणांच्या हस्ते या वेळी आरती करण्यात आली. आरतीची छायाचित्रे आणि ध्वनीफीत सामाजिक संकेतस्थळावरून प्रसारित झाल्याने काही धर्मगुरु, तसेच संघटना यांनी या तरुणांच्या विरोधात फतवा काढला. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉच्या एका पदाधिकार्‍याच्या फतव्याची ध्वनीफीत प्रसारित झाली आहे.

३. विशेष म्हणजे फतव्यात आरती करणार्‍या तरुणांना त्यांच्या पत्नीशी पुन्हा विवाह करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ते इस्लामबाहेर झाल्याने त्यांचे पत्नीशी असलेले वैवाहिक संबंधही संपुष्टात आले आहेत. (स्त्रीमुक्तीवाले याविषयी काही बोलणार का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *