Menu Close

भूतामुळे आयर्लंडमध्ये कॅनडाचे राजदूत भयभीत

डब्लिन : आयर्लंडमध्ये कॅनडाचे राजदूत म्हणून काम करत असलेले केव्हीन विकर्स यांनी फेसबुकवरून आपल्याला चित्रविचित्र आवाज येत असल्याचे म्हटले आहे. राजदूतांसाठीच्या निवासस्थानातील हॉलमध्ये त्यांना कोणीतरी जोराजोरात चालत आहे किंवा कोणाला तरी धाप लागलीय असे आवाज येत असल्याचे विकर्स यांचे म्हणणे आहे.

विकर्स हे इतिहासाचे अभ्यासक आहे, त्यांचे म्हणणे आहे की हे भूत आयर्लंडचे प्रख्यात स्वातंत्र्यसैनिक पॅट्रीक पिअर्स यांचे आहे. ब्रिटीश राजवटीविरोधात बंड पुकारणाऱ्यांमध्ये पिअर्स यांचे नाव अग्रस्थानी आहे. १९१६ साली ब्रिटीशांविरोधात उठाव झाला ज्यात ४५० लोकांचा मृत्यू झाला होता. या उठावानंतर पिअर्स यांना फासावर चढवण्यात आले होते. सध्या विकर्स जिथे राहतात त्याच ठिकाणी आधी पॅट्रीक पिअर्स रहायचे.

फेसबुकवर आपला अनुभव लिहण्याच्या एक दिवस आधी राजदूत विकर्स यांना त्यांच्या स्वयंपाकघरात अवजड साखळी पडल्याचा आवाज आला, ते धावत तिथे गेले मात्र जमिनीवर काहीच पडलेले त्यांना दिसले नाही. ज्यांना माझ्या बोलण्यावर संशय आहे त्यांनी एक किंवा दोन रात्र या निवासस्थानात घालवावी असे आव्हानही विकर्स यांनी दिले आहे !

स्त्रोत : सामना

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *