राष्ट्रीय धर्मसभा नेपालच्या वतीने चतुर्थ राष्ट्रीय पंडित संमेलन
काठमांडू : राष्ट्रीय धर्मसभा नेपाळ या पक्षाची वार्षिक साधारण सभा (बैठक) संपन्न झाली. या सभेकरता पक्षाचे अध्यक्ष प्रा. डॉ. माधव भट्टराई यांनी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना विशेष निमंत्रण दिले होते. या वेळी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले, ‘‘आपण धर्मसभेचे सदस्य आहोत, तर आपला धर्म काय आहे, धर्मसंस्थापना काय आहे, हे जर जाणले नाही, तर भीष्माचार्यांप्रमाणे आपणही कौरवांच्या बाजूने लढू आणि कृष्णाच्या आज्ञेने एखादा अर्जुन आपल्याला नष्ट करेल.’’ या बैठकीत राष्ट्रीय धर्मसभा नेपाळचे सर्व पदाधिकारी आणि प्रमुख सदस्य उपस्थित होते.
सत्वगुणी लोक जेव्हा सत्वगुण सोडून रज-तमाकडे वळतात तेव्हा धर्माला ग्लानी येते. त्यामुळे धर्माची स्थापना करण्यासाठी आधी स्वत: धर्माचे अध्ययन करणे, तो समजूण घेणे, त्याचे आचरण करणे आणि स्वत:मध्ये धर्म स्थापित करणे आवश्यक आहे. ज्यांनी स्वत:मध्ये धर्माची स्थापना केली आहे, अशांनी संघटित होऊन भगवंताच्या आशीर्वादाने समाजात धर्माची स्थापना केली पाहिजे, असे प्रतिपादन सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी राष्ट्रीय धर्मसभा नेपालच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय चतुर्थ राष्ट्रीय पंडित संमेलनात केले. या वेळी कामाख्या उपासक डॉ. दिवाकर शर्मा, ज्योतिषाचार्य डॉ. राजेन्द्र शर्मा उपस्थित होते. संमेलनाचे उद्घाटन काठमांडू येथील ज्योतिर्लिंग पशुपतिनाथ मंदिराचे मुख्य पुजारी श्री. गणेश भट्ट यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले.
श्री गणेश भट्ट म्हणाले, ‘‘ऋग्वेदात सांगितले आहे की, जो बंधन आणि मुक्ती यांचे मर्म जाणतो, तो पंडित होय. पंडितावर (ब्राह्मणावर) समाज आणि राष्ट्र यांना दिशा देण्याचे दायित्व असते. जर तो पथभ्रष्ट झाला, तर त्याचा दोष त्याला लागतो आणि त्याचे परिणाम भोगावे लागतात.’’
क्षणचित्र : या संमेलनात सनातनच्या हिंदी ग्रंथाचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या ग्रंथांना उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
काठमांडू (नेपाळ) येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘आध्यात्मिक जीवशास्त्राचे विज्ञान – वनस्पती जागरूकता’ याविषयावर ५ व्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत शोधप्रबंध सादर
श्री चैतन्य सारस्वत इन्स्टिट्यूशनच्या वतीने येथे १८ आणि १९ ऑगस्ट या कालावधीत ५ व्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी लिहिलेला ‘सायन्स ऑफ स्पिरिच्युअल बायोलॉजी – प्लान्ट सेन्टियन्स’ (Plant Sentience) (आध्यात्मिक जीवशास्त्राचे विज्ञान – वनस्पती जागरूकता) या विषयावरील शोधप्रबंध १९ ऑगस्ट या दिवशी सादर करण्यात आला. हा शोधप्रबंध सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सादर केला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात