मुरगूड (जिल्हा कोल्हापूर) येथे नगराध्यक्षांना निवेदन
मुरगूड (जिल्हा कोल्हापूर) : गणेशोत्सवाच्या काळात नदी आणि तलाव येथे श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केल्यानंतर नदी प्रदूषित होते, हा दावा पूर्ण चुकीचा आहे. कारखान्यांतील सांडपाण्यामुळे नदीचे प्रदूषण होते. त्यामुळे पर्यावरणवादी आणि पुरोगामी मंडळींनी श्री गणेशमूर्ती दान करण्याच्या आवाहनाला नगरपालिका प्रशासनाने बळी न पडता भाविकांना शास्त्रानुसार आणि पारंपरिक पद्धतीने वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास कोणतीही आडकाठीची भूमिका घेऊ नये, तसेच हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावतील, असे कोणतेही कृत्य करू नये, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजी भोकरे यांच्या नेतृत्वाखाली येथील नगराध्यक्ष राजा खान जामदार यांना २६ ऑगस्टला देण्यात आले.
उपस्थित हिंदुत्वनिष्ठ
शिवसेनेचे तालुका प्रमुख श्री. अशोक पाटील, श्री. शिवगोंडा पाटील, उपतालुका प्रमुख श्री. राजेंद्र येझरे, कामगार सेना तालुका अध्यक्ष श्री. आनंदा तिप्पे, विभाग प्रमुख श्री. मारुती पुरीबुवा, शाखा प्रमुख श्री. एकनाथ पालकर, उपशाखा प्रमुख श्री. अमित पाटील, गटप्रमुख श्री. जोतिराम सूर्यवंशी, हिंदुत्वनिष्ठ श्री. धोंडिराम परीट, हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे, श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात