१. प्रवचने
अ. ‘केरळ येथे चालू असलेल्या ‘रामायण मासम्’च्या (रामायण महिन्याच्या) निमित्ताने ३ ठिकाणी प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात रामायण मास आणि नामजप यांचे महत्त्व सांगण्यात आले. एकूण ७७ जणांनी याचा लाभ घेतला. समितीच्या सौ. विजया कुमारी यांनी विषय सांगितला.
आ. ‘जीवनातील गुरूंचे आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व’ या विषयावर एर्नाकुलम् येथे २ ठिकाणी प्रवचने झाली. सौ. शालिनी सुरेश यांनी मार्गदर्शन केले.
२. आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रबोधन करणे
अ. ‘समितीचे कार्यकर्ते एका जातीय संघटनेच्या (एस.एन्.डी.पी) मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीला भेटायला गेले होते. ते केरळमध्ये गणेशोत्सव साजरा करणार आहेत. त्यांनी त्यांच्या नियोजनाच्या बैठकीत समितीच्या कार्यकर्त्यांना बोलावले होते. त्या व्यक्तीने समितीच्या कार्यकर्त्यांना सांगितले, ‘‘तुम्ही प्रामाणिकपणे कार्य करता; म्हणून आम्हाला तुमच्यासारखे कार्यकर्ते हवेत.’’
आ. गणेशचतुर्थीच्या निमित्ताने केरळ येथील ७ गणेश मंडळांना संपर्क करण्यात आला. एर्नाकुलम् जिल्ह्यातील धर्मप्रेमी श्री. रणजीत नायर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. समितीच्या कार्यकर्त्यांनी ‘शास्त्रानुसार गणेशोत्सव कसा साजरा करायचा ?’, याविषयी त्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या समवेत ३ सहकारी होते.
३. जिज्ञासूंसाठी ‘स्वभावदोष-निर्मूलन’ या विषयावर अभ्यासवर्गांचे आयोजन
अधिवक्ता गोविंद भरतन् यांच्या घरी ‘स्वभावदोष-निर्मूलन’ या विषयावर ५ अभ्यासवर्ग झाले. उपस्थित जिज्ञासूंना हा विषय आवडला. अभ्यासवर्गातील सूत्रे कृतीत आणल्यामुळे जिज्ञासूंमध्ये पालट जाणवत आहे. त्यामुळे त्यांनी साधकांना अभ्यासवर्ग चालू ठेवण्यास सांगितले. त्यानुसार जुलैच्या शेवटच्या सप्ताहात ‘अहं निर्मूलन’ या विषयावर अभ्यासवर्ग घेण्यात आला.’
– कु. अदिती सुखटणकर, केरळ (८.८.२०१७)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात