भारतात सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही मशिदींवरील अवैध भोंगे काढले जात नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
बीजिंग : चीनच्या हुओलोंग हुई या प्रांतातील लोकांकडून मशिदीमधून भोंग्याद्वारे देण्यात येणार्या अजानमुळे होणार्या ध्वनीप्रदूषणाची तक्रार प्राप्त झाल्यानंतर शासनाने ३०० हून अधिक मशिदींवरील १ सहस्राहून अधिक भोंगे काढले आहेत.
रहिवाशांनी तक्रार केली होती की, अजानमुळे त्यांना लवकर उठावे लागते आणि काही प्रकरणांमध्ये हृदयविकार असणार्या रुग्णांची स्थिती आणखीनच बिघडत आहे.
अजानसाठी लावण्यात आलेले ध्वनीक्षेपक काढून टाकल्यामुळे तेथील समाजाचा त्रास न्यून झाला आहे. चीनमध्ये मुसलमानविरोधी भावना वाढत असून चिनी सरकार मुसलमानांवर कडक कारवाई करत आहे.
चीनमध्ये आता १८ वर्षांखालील लोकांना मशिदींमध्ये जाण्याची अनुमती नाही, तसेच बुरखा आणि इस्लामी दिसणारी दाढी यांवरही बंदी घालण्यात आली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात