-
हिंदूंकडून भोजशाळेबाहेर होम-हवन आणि पूजा !
-
हिंदुबहुल देशात हिंदूंच्या प्राचीन मंदिरात त्यांनाच पूर्ण दिवस पूजा करण्यास नाकारले जाणे हिंदूंसाठी लज्जास्पद !
भोजशाला (धार, मध्यप्रदेश) : भारतीय पुरातत्व विभागाच्या हिंदुद्रोही निर्णयाला विरोध करत वसंतपंचमीला भोजशाळेत संपूर्ण दिवस अव्याहतपणे होमहवन करू देेण्याच्या हिंदूंच्या मागणीला शासनाने मान्यता दिली नाही. सकाळपासून सहस्रोंच्या संख्येने हिंदू पूजासाहित्य घेऊन भोजशाळेकडे येत होते; परंतु पूजासाहित्य घेऊन भोजशाळेत जाण्यास प्रतिबंध असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत होते. त्यामुळे भोज उत्सव समिती, हिंदू जागरण मंच इत्यादी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सरस्वतीमातेची पूजा-अर्चा आणि होम-हवन भोजशाळेच्या बाहेरच करण्याचा निर्णय घेतला. असे प्रथमच झाले की, भोजशाळेच्या बाहेर पूजा करण्यात आली. भोज उत्सव समितीचे सदस्य अशोक जैन यांनी भोजशाळेतून बाहेर येऊन सांगितले, भोजशाळा परिसराला छावणीचे रूप देण्यात आले आहे. अनेक ठिकाणी पोलिसांना हिंदु भाविकांच्या वेशात उभे करण्यात आले आहे. हिंदू युद्धासाठी नव्हे, तर पूजेसाठी भोजशाळेत जाणार होते. भोजशाळेत असे लोक जमा झाले आहेत, ज्यांचा या पूजेशी काहीही संबंध नाही. त्यामुळे आत पूजा करण्यापेक्षा बाहेरच पूजा करण्यात येईल. यानंतर हिंदूंनी भोजशाळेबाहेरच होमहवन आणि पूजन केले.
१. भारतीय पुरातत्व विभागाने वसंतपंचमीला सूर्योदयापासून दुपारी १२ पर्यंत आणि दुपारी ३.३० नंतर हिंदू भोजशाळेत पूजा करू शकतात, तर दुपारी १ ते ३ या वेळेत मुसलमानांना नमाज पढण्यासाठी भोजशाळा खुली करण्यात येईल, असा आदेश दिला होता. दुपारी १ ते ३ या वेळेत हिंदूंना भोजशाळेत जाण्यास अनुमती नसेल, असेही खात्याने बजावले होते. हिंदु संघटना या हिंदुद्रोही निर्णयाला आधीपासूनच विरोध करत होत्या.
२. भोज उत्सव समितीचे महामंत्री हेमंत दोराया यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, जर शासन भोजशाळेत नमाज पढण्यास देणार असेल, तर एकही हिंदु भोजशाळेत प्रवेश करणार नाही !
३. यासाठी ८ फेब्रुवारीला धारच्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी काढलेल्या वाहनफेरीत ३५ सहस्र हिंदु धर्माभिमानी सहभागी झाले होते.
४. हिंदु संघटनांचे म्हणणे होते की, यज्ञ पूर्णाहुतीशिवाय संपन्न होत नाही. त्यामुळे यज्ञ कोणत्याही विघ्नाशिवाय पार पडायला हवा आणि आम्ही पूर्णाहुती झाल्यावरच उठू.
५. भाजपचे खासदार रघुनंदन शर्मा यांनी म्हटले की, मुसलमानांनी मनाचा मोठेपणा दाखवत वसंतपंचमीला हिंदूंना पूजन करू द्यावे.
हिंदूंनी विचारलेल्या पुढील वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे कोण देणार ?
१. मुसलमानांचे लांगूलचालन करत हिंदूंपासून त्यांचे न्याय्य अधिकार कशाला हिरावून घेतले जात आहेत ?
२. दादरी हत्याकांडाचा उदोउदो करणारे आता भोजशाळेत नमाज पढण्यासाठी अडून बसणार्यांना असहिष्णु का म्हणत नाहीत ?
३. सत्य इतिहास नाकारणे म्हणजे पळवाट काढणे नाही का ?
धार येथे अज्ञातांकडून पोलिसांवर दगडफेक
धार (मध्यप्रदेश) : येथील गंजीखाना भागात अज्ञातांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी लोकांना पिटाळून लावले. यात २ लोकांना अटक केल्याचे सांगण्यात येते; मात्र यास पोलिसांचा दुजोरा मिळू शकला नाही. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
भोजशाळेला छावणीचे स्वरूप !
प्रशासनाने भोजशाळेच्या जवळपास आणि संपूर्ण धार शहरात पुढीलप्रमाणे कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
* १२ भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी (आयपीएस्)
* २५ अतिरिक्त पोलीस अधीक्षक
* ८५ उपअधीक्षक
* १३५ पोलीस निरीक्षक
* ६०० उपनिरीक्षक
* १७५ हवालदार
* विविध तुकड्यांचे १० सहस्र पोलीस
* २५० सुरक्षारक्षक
* २५० महिला पोलीस
* १५० सीसीटीव्ही कॅमेरे
* ड्रोन कॅमेरे
(मुसलमान कशा प्रकारे शासनाची यंत्रणा वेठीस धरत आहेत, ते यातून दिसून येते. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
केवळ २५ मुसलमानांनी नमाज पढला !
केवळ २५ मुसलमानांना नमाज पढण्यासाठी सहस्रो हिंदूंना पूर्ण दिवस पूजेपासून वंचित ठेवणारे आणि त्यासाठी सहस्रो पोलिसांना तैनात करून मनुष्यबळ अन् वेळ यांचा अपव्यय करणारे प्रशासन !
भोजशाळेत नमाज पढण्यासाठी केवळ २५ मुसलमान उपस्थित होते. त्यामुळे एका बाजूला मोठ्या संख्येने हिंदू जमूनही भोजशाळेत त्यांना पूर्ण दिवस पूजा करण्यास अनुमती नव्हती, तर दुसर्या बाजुला नमाज पढण्यास केवळ २५ मुसलमान उपस्थित असल्याचे विरोधाभासी चित्र दिसत होते.
हिंदूंची मागणी मान्य न करण्याच्या शासनाच्या विरोधात स्वामी नरेंद्रानंद सरस्वती महाराज यांच्याकडून धरणे आंदोलन !
हिंदूंना संपूर्ण दिवस भोजशाळेत पूजा करण्याची अनुमती देण्यात यावी, यासाठी काशी सुमेरूपिठाधीश्वर स्वामी नरेंद्रानंद सरस्वती महाराज यांनी धरणे आंदोलन केले. (संतांना आंदोलन करावे लागते हे हिंदूंसाठी लज्जास्पद ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात