पुणे येथे जिल्हाधिकार्यांना निवेदन
पुणे : येत्या २ सप्टेंबरला बकरी ईद असून त्या दिवशी मुसलमानबहुल वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गायींची कत्तल केली जाते, असा पूर्वानुभव आहे. याच काळात गणेशोत्सवही चालू असून श्री गणेशाच्या मूर्तीसमोर गोमांस फेकणे आणि कायदा-सुव्यवस्था बिघडवणे, अशा अनुचित घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्या दिवशी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी जाणीवपूर्वक गोहत्या केली जाते. परिणामी धार्मिक तणाव निर्माण होऊन सामाजिक अशांतता निर्माण होते. येणार्या बकरी ईदच्या दिवशी धर्मांध समाजकंटक गोवंशाची मोठ्या प्रमाणावर कत्तलीसाठी खरेदी करत आहेत. वारंवार घडणार्या गोहत्या, गोमांस तस्करी आदींमुळे गोप्रेमींमध्ये तीव्र अप्रसन्नता आहे. यासाठी प्रशासनाने सतर्क राहून ऐन गणेशोत्सवात गोहत्या होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, ठिकठिकाणी टेहाळणीसाठी पोलीस पथके सिद्ध ठेवावीत आणि गोतस्करांवर लक्ष ठेवावे, तसेच गणेशोत्सवातील वातावरण कलुषित करू पहाणार्या धर्मांध गोतस्करांवर कडक कारवाई करावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन गोप्रेमी, गणेशभक्त आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी २९ ऑगस्टला जिल्हाधिकार्यांच्या नावे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना दिले. या वेळी शिवसेना शाखाप्रमुख श्री. ऋषिकेश कुलकर्णी, गणेशभक्त श्री. अक्षय भेगडे, शिववंदना महासंघाचे श्री. विशाल आल्हाट, योग वेदांत समितीचे श्री. सुधाकर संगनवार, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रवीण नाईक हे उपस्थित होते. या प्रसंगी मुठे यांनी सांगितले की, निवेदनात म्हटल्याप्रमाणे अपप्रकारांना आळा बसण्यासाठी विशेष पथके नेमली असून प्रयत्न करू.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोहत्या रोखण्यासाठी पोलिसांना निवेदन !
धुळे : महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याचे उल्लंघन होऊ नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी यासाठी शहरातील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून पोलीस उपअधिक्षक हिंमत जाधव यांना निवेदन देण्यात आले. या वेळी योग वेदांत समितीचे डॉ. योगेश पाटील, स्वदेशी जागरण मंचचे श्री विलास राजपूत, समितिचे श्री. पंकज बागुल, विश्व हिंदु परिषदेचे श्री. संजय शर्मा, हिंदु एमता आंदोलन पक्षाचे श्री. मनोज घोडके यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
धुळे येथे कत्तलीसाठी जाणारी गुरे धर्मांध व्यापाऱ्या कडून कर्ह्यात !
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि बकरी ईद मुळे शहरातील गोवंशियांची दाटीवटीने अवैधरित्या वाहतूक चालू असून धुळे शहरात कत्तलीच्या उद्देशाने महामार्गावर आणि शहरातून तसेच आजादनगर, चाळीसगाव रोड, देवपूर पोलीस ठाण्याच्या परिसरात काही धर्मांधाच्या गोठ्यात आणि घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोवंशीय ठेवण्यात आले आहेत.
शहरातील वडजाईरोड परिसरातील हाफीज सिद्दीकी नगरात एका गोडाऊनमध्ये १० गायी आणि एका वासरू यांना क्रूरपणे दाटीवाटीने बांधले होते. या ठिकाणी त्यांना कत्तलीसाठी आणण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी हॉटेल मालक अजिज मोहंमद गुरफान अंसारी याच्याविरुद्ध चाळीसगांव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
बकरी ईदच्या निमित्ताने कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या गोवंशाची कत्तल थांबवा !
हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने विटा आणि मिरज येथे निवेदन
सांगली : २ सप्टेंबर २०१७ दिवशी बकरी ईद असून मुस्लीम बहुल वस्त्यांमध्ये मुसलमान आणि कसायांकडून मोठ्या प्रमाणावर गायींची कत्तल होण्याची शक्यता आहे. याच कालावधीत गणेशोत्सव चालू असल्याने एखाद्या गणेशोत्सवाच्या मंडपाच्या जवळ गोमांसाचे तुकडे सापडण्यासारखा प्रकार घडल्यास मोठ्या प्रमाणात कायदा-सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ईदच्या पार्श्वभूमीवर अनेक मुसलमान कसायांकडून गायी आणि वासरे यांची मोठ्या प्रमाणावर खरेदीची शक्यता नाकारता येत नाही, तसेच अनेक मुसलमान वस्त्यांमध्ये गायी आणि वासरे बांधून ठेवल्याचे काही गोरक्षकांना दिसून आले आहे. तरी या विषयी प्रशासनाने सतर्क राहून गोहत्या होणार नाहीत, याकडे लक्ष दिले पाहिजे, तसेच ठिकठिकाणी टेहाळणी पथके ठेवून यावर लक्ष ठेवायला हवे, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने मिरज येथे प्रांत कार्यालयात, तसेच विटा येथे तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.
विटा येथे नायब तहसीलदार श्री. नवनाथ लांडगे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु धर्मसेनेचे सर्वश्री गणेश लोकरे, प्रमोद निकम, शुभम सुतार, अभिषेक निकम, शिव शिंदे, अमर शिंदे, भारतीय सैन्य दलातील सैनिक श्री. महेश सावंत, यांसह हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते. मिरज येथे शिव उद्योग सहकार सेनेचे श्री. पंडितराव (तात्या)कराडे, युवासेनेचे श्री. कुबेरसिंह राजपूत यांसह हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात