हिंदूंच्या मूळावर उठलेला जिहादी आतंकवाद ! हिंदूंची मंदिरे, त्यांचे नेते आदींना लक्ष्य करू पहाणार्या जिहादी आतंकवादाचा सामना हिंदू कसा करणार आहेत ?
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दादर येथील शिवसेना भवन हे आतंकवाद्यांचे लक्ष्य होते, अशी स्वीकृती २६/११ च्या आक्रमणातील प्रमुख सूत्रधार दाऊद गिलानी उपाख्य डेव्हिड कोलमन हेडली याने दिली. अमेरिकेतील कारागृहात जेरबंद असलेल्या हेडलीची सध्या मुंबई उच्च न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष नोंदवणे चालू आहे. साक्ष नोंदवण्याचा १२ फेब्रुवारी हा ५ वा दिवस होता. त्या वेळी त्याने वरील माहिती दिली. तो म्हणाला, शिवसेना भवनात प्रवेश मिळवण्यासाठी मी राजाराम रेगे नावाच्या व्यक्तीशी चांगली मैत्री केली. रेगे यांना मी शिवसेना भवनात भेटलो होतो. मी शिवसेना भवनाची रेकी केली होती. याची माहिती लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनेला पुरवण्याच्या दृष्टीने मी शिवसेना भवनात शिरलो होतो.
ओळख लपवण्यासाठी जिहादी आतंकवाद्यांच्या हातात सिद्धीविनायक मंदिरात मिळणारा लाल-पिवळा दोरा बांधला !
हेडलीने पुढे म्हणाला, मी सिद्धीविनायक मंदिराचीही रेकी केली होती, तसेच तेथील छायाचित्रणही केले होते. (भारतीय गुप्तचर यंत्रणांचे याहून मोठे अपयश कुठले असेल ? आतंकवादी उघडपणे येऊन हिंदूंच्या मंदिरांची, हिंदूंच्या कार्यालयांची रेकी करून जातात आणि गुप्तचर यंत्रणांना त्याचा थांगपत्ताही लागत नाही, हेच यावरून स्पष्ट होते. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) याशिवाय मी सिद्धीविनायक मंदिरातून लाल आणि पिवळ्या रंगांचे हातात बांधायचे काही धागे विकत घेतले होते. पाकिस्तानमध्ये परतल्यानंतर हे धागे मी साजीद मीरला दिले. हे धागे आतंकवाद्यांना बांधण्यास सांगण्यात आले होते. जेणेकरून २६/११ च्या आक्रमणाच्या वेळी आतंकवादी पकडले गेलेच, तर त्यांची ओळख लपावी, तसेच ते भारतीय (हिंदु) आहेत, असे वाटावे. (हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठीची आतंकवाद्यांची चलाखी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) माझी ही कल्पना साजीदला फारच आवडली होती. त्याने सर्व १० आतंकवाद्यांना हे धागे बांधले होते. (२६/११च्या आक्रमणातील आतंकवादी कसाब पकडला गेल्यानंतर निधर्मी प्रसारमाध्यमांकडून त्याच्या हातात बांधलेला लाल-पिवळा दोरा वारंवार दाखवला जात होता. प्रसारमाध्यमांकडून हे आक्रमण हिंदूंनी केले असल्याचे वारंवार भासवले जात होते. हिंदूंना कायमच लक्ष्य करण्याची भारतातील निधर्मी प्रसारमाध्यमांची वृत्ती आतंकवाद्यांनी अचूक हेरली आणि त्याचाच अपलाभ उठवत वरील कृत्य केले, ज्यास निधर्मी प्रसारमाध्यमे बळी पडली, असे कोणालाही वाटेल. यावरून जिहादी आतंकवाद्यांनी भारतातील निधर्मी प्रसारमाध्यमांना आतंकवाद्यांच्या हातातील बाहुली बनवले, असे कुणाला वाटल्यास त्यात नवल काय ? हिंदूंना आतंकवादी ठरवू पहाणार्या प्रसारमाध्यमांवर शासनाने कठोर कारवाई करावी ! हिंदूंनो, तुम्हाला जाणूनबुजून अपकीर्त करू पहाणार्या प्रसारमाध्यमांवर बहिष्कार घाला ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
मुंबई विमानतळावर आक्रमण न झाल्याने मेजर इक्बाल नाराज !
२६/११ च्या आक्रमणात लष्कर-ए-तोएबा या आतंकवादी संघटनेचे मुंबई विमानतळही आतंकवाद्यांचे लक्ष्य होते, असा खुलासा हेडलीने केला. २६/११च्या आक्रमणात मुंबई विमानतळावर आक्रमण न झाल्याने आतंकवादी मेजर इक्बाल हा नाराज झाला होता, अशीही माहिती हेडलीने त्याच्या साक्षीत दिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात