सातारा : येथील नगरपालिका प्रशासनाच्या वतीने प्रतापसिंह उद्यानातील शेती फार्मच्या जागेत कृत्रिम तलाव खोदण्यात आला आहे. सातव्या दिवशीही या तलावात पुष्कळ अल्प प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते. तसेच ज्या जागेवरून गणेशमूर्ती विसर्जन केले जात होते, तिथून गणेशमूर्ती विसर्जित झाल्यावर मानेवर पडल्यामुळे त्या भंग पावत आहेत. गणेशमूर्ती विसर्जनासाठी उभारण्यात आलेले व्यासपीठ चुकीच्या पद्धतीने उभारले गेल्याने असे होत आहे, असे समजते. नगरपालिकेने केलेल्या असुविधेमुळे होणारी ही श्री गणेशाची विटंबना पाहून उपस्थित भाविक हळहळ व्यक्त करत आहेत.
दायित्वशून्यपणे वागणार्या जिल्हा प्रशासनाकडून सातारा नगरपालिकेला बलपूर्वक कृत्रिम तलावाचे पाऊल उचलण्यास भाग पाडले आहे. २५ ऑगस्टला गणपति बसणार, तर २२ ऑगस्टला कृत्रिम तळे खोदण्यासाठी घेण्यात आले. याच वेळी गणेशभक्तांकडून तळे पूर्ण होण्यावर शंका उपस्थित केली जात होती. ती शंका सत्यात उतरल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
७ व्या दिवशी विसर्जनस्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पालिका कर्मचारी आणि पोलिसांचा फौजफाटा उपस्थित होता. तसेच शहरातील मंगळवार तळे आणि मोती तळे परिसरात पोलिसांचा पहारा होता.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात