-
श्री गणेशमूर्तीचे सातव्या दिवशी वहात्या पाण्यात विसर्जन करून भाविकांनी केले धर्मपालन !
-
सनातन आणि हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनाचा परिणाम
जयसिंगूपर (जिल्हा कोल्हापूर) : श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी अंकली पुलाजवळ (उदगाव) कृष्णा नदीच्या काठावर हातात फलक घेऊन गणपतीच्या ७ व्या दिवशी म्हणजे ३१ ऑगस्ट या दिवशी प्रबोधन केले. समितीच्या प्रबोधनामुळे अनेकांनी मूर्तीदान न करता पाण्यात विसर्जन करणे पसंत केले.
उदगाव ग्रामपंचायतीच्या वतीने फलक लावून हिंदुधर्मशास्त्र विरोधी मूर्तीदान अभियान !
श्री गणेशमूर्तीमुळे प्रदूषण होते, तरी नागरिकांनी मूर्ती विसर्जन न करता त्या दान कराव्यात, असे आवाहन करणारे फलक उदगाव ग्रामपंचायतीच्या वतीने नदीकाठी लावण्यात आले होते. यामुळे अनेक भाविकांनी मूर्ती विसर्जन न करता त्या काठावरच ठेवल्या. नदीकाठी जवळच खड्डे खणण्यात आले असून या खड्यात मूर्ती विसर्जित करून ते बुझवले जाणार आहेत.
क्षणचित्रे
१. जयसिंगपूर येथील शाहूनगर येथील विभचचौक गणेशोत्सव मंडळाने तराफ्यावरून श्री गणेशमूर्ती नदीत सोडून धर्माचरणास हातभार लावला.
२. श्री गणेशमूर्तीमुळे प्रदूषण होत नाही, तरी भाविकांनी नदीतच विसर्जन करावे, असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठानचे शंकराराव कुलकर्णी यांनी भाविकांना केले.
३. नदीवर विसर्जनासाठी येणारे अनेक जण उत्सुकतेने फलक वाचत होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात