Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु तेजा जाग रे ! या नाटिकेला गणेशोत्सव मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

गणेशोत्सव मंडळांची नवरात्रोत्सवातही समितीचे उपक्रम ठेवण्याची सिद्धता !

गणेशोत्सव मंडळात स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर करतांना समितीचे कार्यकर्ते

सोलापूर : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दरवर्षी राबवण्यात येणार्‍या आदर्श गणेशोत्सव मोहिमेतंर्गत हिंदु तेजा जाग रे या नाटिकेचे सोलापूर शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांमध्ये सादरीकरण करण्यात येत आहे. या नाटिकांमध्ये महिलांवरील वाढते अत्याचार, तरुणींची होणारी छेडछाड, लूटमार, असे प्रसंग घडतांना प्रत्येकाने त्याचा यशस्वी सामना कसा करावा आणि त्यासाठी प्रत्येकाने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता याचे महत्व प्रात्यक्षिकाद्वारे दाखविण्यात येत आहे. या नाटिकेला महिला आणि तरुणांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. तसेच अन्य  गणेशोत्सव मंडळांकडून या नाटिकेच्या सादरीकरणासाठी मागणी येत आहे. आतापर्यंत येथील निलमनगर, सुनीलनगर, विडी घरकूल आदी परिसरांमध्ये याचे सादरीकरण करण्यात आले आहे.

महिलांनी त्यांच्यावर होणारे अत्याचार निमूटपणे सहन न करता स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन त्याचा प्रतिकार करणे आणि महान हिंदु स्त्रीचा वारसा पुढे चालवणे या आणि अशा अन्य सामाजिक असुरक्षिततेच्या समस्यांवर नाटिकेच्या माध्यमातून व्यापक जागृती आणि प्रबोधन करण्यात येत आहे.

भारतासमोर आव्हान असलेले बांगलादेशी घुसखोरांची समस्या, डोकलामप्रश्‍नी चीन भारताला देत असलेली युद्धाची धमकी, सीमावर्ती भागांमध्ये असलेली तणावसदृष्य परिस्थिती आदी विषयांवरही नाटिकेच्या माध्यमातून जागृती करण्यात येत आहे.

क्षणचित्रे 

१. नीलम नगरचा राजा या गणेशोत्सव मंडळात नाटिकेचे सादरीकरण चालू असतांना तेथून जवळ असलेल्या राजघराणा प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळाचे १०-१२ तरुण नाटिका पहाण्यास आले आणि त्यांना नाटिका पुष्कळ आवडल्याचे सांगितले. यापूर्वी दोन्ही गणेशोत्सव मंडळांमध्ये आपापसांत मतभेद होते.

२. आमच्या मंडळातही नाटिका सादर करा ! –  अन्य एक गणेशोत्सव मंडळ

३. हिंदु जनजागृती समितीचे क्रांतीकारक फलक प्रदर्शन दाखवतो ! –  नीलमनगर येथील गणेशोत्सव मंडळ

४. ४ ठिकाणी नाटिकेचे आयोजन करीन ! – एका धर्माभिमानी

५. नवरात्रोत्सवातही समितीच्या उपक्रमांचे आयोजन करू ! – काही गणेशोत्सव मंडळे

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *