नागपूर : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गणेशोत्सव आदर्श साजरा करा या मोहिमेच्या अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळे आणि वसाहती या ठिकाणी गणेशमूर्ती शास्त्रानुसार कशी असावी, गणपतीला लाल फूल, दूर्वा का वहाव्यात ?, मोदकाचा भावार्थ काय ?, सार्वजनिक गणेशोत्सवात काय असावे आणि काय नसावे ?, मूर्ती विसर्जन करतांना कृत्रिम हौदात न करता वहात्या पाण्यात करण्याचे महत्त्व तसेच चिनी मालावर बहिष्कार घाला ! या विषयावर समितीच्या सौ. किरण जैन आणि श्री. अतुल अर्वेन्ला यांनी प्रबोधन केले. या प्रवचनांना धर्माभिमान्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच अन्य काही गणेशोत्सव मंडळांमध्ये प्रबोधन करण्याचे आणि धर्मशिक्षण देणारे अन् क्रांतीकारकांचे फलक प्रदर्शन लावण्याचे आयोजन करण्यात आले आहे.
वैशिष्ट्यपूर्ण
१. या प्रचनांच्या माध्यमातून समाजातून २ धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी आली आहे.
२. हिंदु जनजागृती समितीच्या उपक्रमांना अनेक गणेशोत्सव मंडळे सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात