Menu Close

सांगली महापालिकेने मूर्तीदानासारखी संकल्पना राबवून हिंदूंच्या धार्मिक परंपरांमध्ये हस्तक्षेप करू नये !

समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने महापालिका आयुक्तांना निवेदन

मध्यभागी निवेदन स्वीकारतांना प्रभाग क्रमांक १ चे अधिकारी श्री. एस्.व्ही. पाटील आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ

सांगली : श्री गणेशमूर्तीमुळे प्रदूषण होत नसतांना डॉल्फिन नेचर क्लब आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ कृष्णा व्हॅली यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णा नदीच्या घाटावर हिंदुधर्मविरोधी गणेशमूर्तीदान अभियान राबवण्यात आले. दान घेतलेल्या या मूर्त्यांना क्रमांक देण्यात आले असून भाविकांना या मूर्ती पुढील वर्षी परत देण्यात येणार आहेत. अध्यात्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जनच व्हायला हवे ! अशाप्रकारे मूर्ती दान घेऊन पुढच्या वर्षी देणे हे पूर्णत: हिंदु धर्मशास्त्राच्या विरोधात आहे. त्यामुळे सांगली महापालिकेने गणेशोत्सवात मूर्तीदानसारख्या अशास्त्रीय संकल्पना राबवून हिंदूंच्या धार्मिक परंपरांमध्ये हस्तक्षेप करू नये, असे निवेदन सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्तांच्या नावे देण्यात आले. हे निवेदन प्रभाग क्रमांक एकचे अधिकारी श्री. एस्.व्ही. पाटील यांनी स्वीकारले.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, कृष्णा नदीत वर्षभर कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी मिसळते, तसेच महापालिकेचे शेरीनाल्याचे पाणी नदीत मिसळते, नदीकाठी कपडे आणि गुरे धुतात. कृष्णा नदीत काही साखर कारखान्यांचे पाणीही मिसळते. यांमुळे कृष्णा नदी कितीतरी पट प्रदुषित होते. असे असतांना वरील संघटना या नदीत होणार्‍या प्रदुषणाविषयी आवाज उठवतांना दिसत नाहीत. तरी सांगली महापालिकेने गणेशोत्सवात मूर्तीदानासारख्या धर्मविरोधी आणि अशास्त्रीय संकल्पना राबवू नयेत आणि हिंदूंच्या धार्मिक परंपरांमध्ये हस्तक्षेप करू नये ! या वेळी वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. धर्मेंद्र (आबा) कोळी, श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. सचिन पवार, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री रेठरेकर, देसाई उपस्थित होते. या निवेदनास माळी समाजाचे विश्‍वस्त श्री. श्रीकृष्ण माळी, तसेच गोरक्षा समितीचे श्री. सचिन पवार यांनी पाठिंबा असल्याचे कळवले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *