-
इस्लामी बांगलादेशमध्ये हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्या धर्मांधांचा जिहादी दिनक्रम चालूच !
-
बांगलादेश शासन हिंदूंची बिकट स्थिती सुधारण्यासाठी काही उपाययोजना करत नाही आणि भारत शासनही यावर बांगलादेशला काही जाब विचारत नाही !
ढाका (बांगलादेश) : ८ फेब्रुवारी या दिवशी गईबंधा जिल्ह्यातील बर्धनकुटी क्षेत्रात पोलिसांना एक कापलेले शीर सापडले आणि धड वेगळ्या ठिकाणी पडल्याचे आढळून आले. याचे अन्वेषण केल्यावर तरुण दत्ता नावाच्या ४५ वर्षीय हिंदु व्यापार्याचे ते असल्याचे निष्पन्न आले.
गोविंदगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी अमिनुल इस्लाम यांनी या माहितीला दुजोरा दिला असून काही धर्मांधांना खंडणी देण्यास नाकारल्यामुळे तरुण दत्ता यांची हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाजही इस्लाम यांनी व्यक्त केला आहे.
१. तरुण दत्ता यांच्या पश्चात दोन अल्पवयीन मुले आणि पत्नी मिता रानी दत्ता असा परिवार आहे.
२. वरील अमानावीय घटनेचा निषेध करण्यासाठी १० फेब्रुवारीला गोविंदगंज शहरातील विविध व्यापारी संघटना आणि हिंदु उत्सव समितीचे कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी रंगपूर-बागुरा या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
३. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अन्वेषण चालू आहे. आतापर्यंत कोणाला अटक करण्यात आलेली नाही.
४. बांगलादेश मॉयनॉरिटी वॉचचे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांनी यांसदर्भात चौकशी केली. तरुण दत्ता यांच्या पत्नीशी दूरभाषवरून संपर्क साधून त्याचे सांत्वन केले.
५. यावेळी श्रीमती दत्ता यांनी पतीच्या हत्येमागे काही जिहादी धर्मांध असल्याचा संशय व्यक्त केला.
६. मिळालेल्या माहितीनुसार बांगलादेशमधील हिंदु व्यापारी दहशतीच्या सावटाखाली जगत आहेत. जिहादी संघटनांकडून त्यांच्यावर वरचेवर आक्रमणही करण्यात येते. आक्रमणकर्ते विविध राजकीय पक्षांशी संबंधित असल्याचेही लक्षात आले आहे. (असे होत राहिले, तर बांगलादेशातील हिंदू नामशेष होण्यास वेळ लागणार नाही. केंद्रशासन याप्रकरणी काही करील, अशी अपेक्षा न ठेवता आता भारतातील हिंदूंनीच बांगलादेशातील आपल्या बांधवांच्या रक्षणासाठी संघटित होणे अपेक्षित आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात