Menu Close

भाजप अयोध्येत राममंदिर बनवू शकत नसेल, तर शिवसेना स्वबळावर मंदिर बनवील : संजय राऊत

शिवसेनेच्या प्रखर हिंदु धर्माभिमानामुळेच ती हिंदूंना जवळची वाटते !

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी येथे आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित केले. ते म्हणाले की, हिंदुत्वाच्या सूत्रामुळेच भाजप केंद्रात सत्ता स्थापन करू शकला; पण भाजप शासन राममंदिर बनवू शकत नसेल, तर त्याने सत्ता सोडून द्यावी. भाजपने हिंदुत्वाच्या सूत्रावरून कोलांटीउडी मारली आहे. त्यामुळेच तो राममंदिरावर स्वतःचे मत व्यक्त करत नाही.

संजय राऊत पुढे म्हणाले की,

१. २०१७ च्या उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत शिवसेना सर्व ३५० जागांवर निवडणूक लढवील.

२. जर शिवसेनेचे २० उमेदवारही निवडून आले तरी त्यांना हाताशी धरून राममंदिराची उभारणी करण्यात येईल. हिंदुत्वाच्या सूत्रावर शिवसेना सदैव जनतेबरोबर राहिली आहे.

३. राऊत यांनी उत्तरप्रदेशच्या सत्ताधारी समाजवादी पक्षावर आक्रमण करीत तिला पाकप्रेमी संबोधित करत म्हटले, पाकिस्तान भारताचा सर्वांत मोठा शत्रू असतांना पाकिस्तानी गायकांना बोलावून उत्तरप्रदेश शासन गुलाम अलीसारख्या लोकांना सन्मानित करते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *