नवी देहली/ कराची : ‘आयएसआय’ ही पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘जैश-ए-मोहम्मद’ व ‘लश्कर-ए-तोयबा’च्या अतिरेक्यांना ट्रेनिंग देत असल्याचे पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांनी कबूल केले आहे. इतकेच नव्हे तर मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिझ सईद देशाचा ‘हीरो’ असल्याचेही मुशर्रफ यांनी म्हटले आहे.
पठाणकोट एअरबेसवर झाल्याल्या हल्लाचा मास्टरमाइंड मौलाना मसूद अझहर हा मात्र अतिरेकी असल्याचे मुशर्रफ यांनी सांगितले.
मुशर्रफ यांनी अतिरेक्यांना का संबोधले ‘फ्रीडम फायटर’?
- मुशर्रफ यांनी टीव्ही चॅनल इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत भारतावर अनेक आरोप केले.
- भारत-पाकमध्ये शांतता कायम न ठेवण्यासाठी भारतच दोषी असल्याचे मुशर्रफ यांनी म्हटले आहे. भारत केवळ अतिरेक्यांच्या मुद्द्यावर अडून बसला आहे. बाकी मुद्द्यांचे काय? असा प्रश्नही मुशर्रफ यांनी केला आहे.
- काश्मीरच्या स्वातंत्र्याच्या लढाईत सहभागी झालेले अतिरेकी नसून ते माझ्यासाठी ‘फ्रीडम फायटर’ असल्याचे मुशर्रफ यांनी यावेळी म्हटले.
डेव्हिड हेडलीच्या साक्षवर विश्वास नाही- मुशर्रफ
- मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याचा मास्टरमाइंड डेव्हिड हेडली याने दिलेल्या साक्षमध्ये पाकचा नापाक चेहरा चव्हाट्यावर आणला आहे. पाकबाबत त्याने अनेक गौप्यस्फोट केले आहेत. मात्र, हेडलीच्या साक्षवर आपला विश्वास नसल्याचे मुशर्रफ यांनी म्हटले आहे. भारताच्या दबावात आल्याने हेडली साक्ष देत आहे. पाकिस्तानलाही हेडलीची चौकशी करण्याची परवानगी मिळावी, असे मुशर्रफ यांनी म्हटले आहे.
- २००७ मध्ये समझौता एक्स्प्रेस ब्लास्टमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना भारताने पाकिस्तानच्या हवाली करावे. भारतच पाकिस्तानात दहशतवाद पसरवत आहे.
- लश्कर पाकिस्तानात हल्ले करत नाही. त्याच्या मागे रॉच्या एजंट्सचा हात आहे.
- हिंसा पसरवणारे लोक पाकिस्तानसह भारतातही आहे. मोदी पाकिस्तानात फक्त ‘हॅप्पी बर्थडे’ म्हणायला आले होते.
- उभय देशातील महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्याची भारताची तयारी नाही. प्रत्येक अतिरेकी हल्ल्यासाठी भारत पाकिस्तानला जबाबदारी ठरवतो.
- पठाणकोट हल्ल्याची पाकिस्तानात चौकशी सुरु आहे. मसूद अझहरचा शोध घेतला जात आहे.
- पाकिस्तानी लष्कराला देखील शांतता हवी असल्याचे मुशर्रफ यांनी म्हटले आहे.
संदर्भ : दिव्य मराठी