नसरापूर (जिल्हा पुणे) येथे गणेशोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचन
पुणे : येथील नसरापूर गावामधील ‘स्वप्नलोक टाऊनशिप’ या वसाहतीमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. विठ्ठल जाधव यांनी ‘गणेशपूजन अध्यात्मशास्त्र, उत्सवांतील अपप्रकार आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर ३१ ऑगस्टला प्रवचन घेतले. या प्रवचनानंतर अनेक गणेशभक्त, मंडळाचे अध्यक्ष श्री. गणेश बागल, तसेच त्यांचे सहकारी यांनी अनेक अध्यात्मशास्त्रीय शंकांचे निरसन करून घेतले आणि ‘येथून पुढे सर्व धार्मिक कृती शास्त्रानुसार करू’, असे उत्स्फूर्तपणे सांगितले. याचसमवेत प्रवचनाच्या ठिकाणी उपस्थित असलेले सनातन प्रभातचे वाचक आणि हितचिंतक श्री. षण्मुग चंद्रशेखर शेट्टी यांनी आपणहून उपस्थितांना सनातन प्रभातचे वाचक होण्याचे आवाहन केले. प्रवचनानंतर श्री. जाधव यांच्या हस्ते मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेतील बालकांना बक्षीस वितरण करण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात