Menu Close

मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) येथे श्री गणेशमूर्तींचे शंभर टक्के वहात्या पाण्यात विसर्जन !

मलकापूर : येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रबोधनामुळे सर्व श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विर्सजन करण्यात आले. गेल्या २ वर्षांपासून अशी मोहीम राबवण्यात येत असून याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ही मोहीम राबवतांना मूर्तीदान मागणारे तरुण घाटावर फिरकले नाहीत. तसेच निर्माल्याविषयी प्रबोधन केल्यानंतर भाविकांनी नगरपालिकेने ठेवलेल्या निर्माल्य कुंडाऐवजी वहात्या पाण्यात निर्माल्य विसर्जन करण्याला प्राधान्य दिले.

केवळ १० ते १२ भाविकांनी निर्माल्य निर्माल्य कुंडात टाकले. या वेळी एका भाविकाने ‘मूर्तीचे नदीच्या वहात्या पाण्यात विसर्जन करा’, असे प्रबोधन करणार्‍या सनातनच्या साधिका सौ. राजश्री मगर यांच्याशी वाद घातला; मात्र सौ. मगर यांनी सडेतोड प्रबोधन केल्यानंतर तो भाविक निघून गेला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *