म्यानमारच्या सैनिकांची आतंकवाद्यांच्या विरोधातील कारवाई
यांगून : म्यानमार सरकारने सांगितले की, गेल्या आठवडाभरात रोहिंग्या मुसलमानांची २ सहस्र ६०० हून अधिक घरे जाळ्यात आली आहेत. सरकारी वर्तमानपत्र ‘ग्लोबल न्यू लाइट ऑफ म्यानमार’च्या वृत्तानुसार कोटनकौक, मिनलुट आणि कयिकनपयिन या गावांमध्ये घरांची जाळपोळ करण्यात आली. यासाठी ‘अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मी (एआर्एस्ए) उत्तरदायी आहे, असे यात म्हटले आहे. या संघटनेने सैनिकांवर आक्रमण केले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात