Menu Close

हिंदु जनजागृति समिती आणि सनातन संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा (जळगाव) येथे ‘आदर्श गणेशोत्सव साजरा’ !

जळगाव : चोपडा येथील राणी लक्ष्मीबाई गणेश मित्र मंडळाच्या वतीने ‘आदर्श गणेशोत्सव’ हिंदु जनजागृति समिती आणि सनातन संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.

कसा केला आदर्श गणेशोत्सव साजरा ?

१. या मंडळाने सात्त्विक आणि शाडूमातीची मूर्ती बसवली होती.

२. प्रतिदिन दोन्ही वेळा शांत आणि लयबद्धरित्या आरती म्हणण्यात आली. त्यामुळे भाविकांची भावजागृती झाली आणि त्यांना समाधानही लाभले. ‘‘आरती शास्त्रानुसार योग्य पद्धतीने म्हटल्याने आरतीतून मिळणार्‍या चैतन्याचा लाभ खर्‍या अर्थाने घेता आला’’,  अशी प्रतिक्रिया भाविकांनी व्यक्त केली.

३. विसर्जन मिरवणुकीत मुलींनी पारंपरिक पद्धतीने वेशभूषा केली होती. तसेच भजन आणि नामजपाच्या गजरात गणरायाची पालखी काढण्यात आली होती. या मिरवणुकीवर मुख्य चौकाच्या ठिकाणी धर्मप्रेमी हिंदुकडून पुष्पवृष्टी करण्यात येत होती.या मिरवणुकीत गुलाल उधळण्यात आला नाही.

४. विसर्जन मिरवणुकीचा आरंभ श्री गणरायाच्या प्रार्थनेने आणि शेवट कृतज्ञतेने करण्यात आला होता.

५. तसेच मुख्य चौकांमध्येही सामूहिक प्रार्थना करण्यात आल्या.

चोपडा शहरात पहिल्यांदाच अशा प्रकारची मिरवणूक काढल्यामुळे विविध संघटना आणि पदाधिकार्‍यांनी ही आदर्श मिरवणूक पाहून कौतुक केले. या वेळी बहुतेक सर्व मंडळांनी ‘‘आम्हीही पुढील वर्षी शाडूमातीची आणि लहानच मूर्ती स्थापन करू’’, असे सांगितले.

या मिरवणुकीत विवेकानंद विद्यालयाच्या मुलींच्या लेझीम पथकाने सर्व चोपडावासियांचे लक्ष वेधून घेतले होते. आदर्श मिरवणुकीतील श्री गणरायाचे दर्शन घेण्याकरता पोलीस निरीक्षक किसनराव पाटील हेही आले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *