‘लाईफ स्किल्स्’ या संघटनेकडून व्याख्यानाचे आयोजन
चेन्नई : येथील ‘लाईफ स्किल्स्’ या संघटनेच्या वतीने येथे मासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘श्री गणेशचतुर्थी’ या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. ‘लाईफ स्किल्स्’कडून प्रतिमास जीवनमूल्ये, व्यक्तिमत्व विकास इत्यादी विषयांवर बैठकांचे आयोजन केले जाते. या मासात त्यांनी हिंदु जनजागृती समितीला व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित केले होते. या वेळी समितीचे श्री. विनायक शानभाग यांनी गणेशचतुर्थी’ या विषयावर व्याख्यान दिले. ४० हून अधिक जिज्ञासूंनी या व्याख्यानाचा लाभ घेतला. या वेळी ‘लाईफ स्किल्स्’चे श्री. राजेंद्रन् यांच्या हस्ते श्री. विनायक शानभाग यांचा सत्कार करण्यात आला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने इंदूर (मध्यप्रदेश) येथे प्रवचन
इंदूर (मध्यप्रदेश) : श्री गणेशोत्सवानिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथील श्री साई रेसीडन्सी या संकुलामध्ये प्रवचन घेण्यात आले. या वेळी समितीचे मध्यप्रदेश समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी जीवनातील तणावामागील विविध कारणे, तणाव दूर करण्यासाठी स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन प्रक्रिया, आध्यात्मिक साधना आदींच्या संदर्भात मार्गदर्शन केलेे. या प्रवचनाचा लाभ संकुलातील सदस्यांनी घेतला.
क्षणचित्रे
१. या वेळी ‘देवळात दर्शन कसे घ्यावे ?’ या विषयावर फ्लेक्स फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले.
२. वाढदिवस कसा साजरा करावा ? देवाला नमस्कार कसा करावा ? आदी विषयांवर लहान मुलांना ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
कोंडुगेयुर, चेन्नई येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान
चेन्नई : कोंडुगेयुर येथे तमिळनाडू शिवसेनेचे अध्यक्ष श्री. जी. राधाकृष्णन् यांनी आयोजित केलेल्या सार्वजनिक श्री गणेशोत्सवात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान घेण्यात आले. या वेळी समितीच्या तमिळनाडू समन्वयक सौ. उमा रविचंद्रन् यांनी‘श्री गणेशचतुर्थी’ या विषयावर माहिती दिली. सौ. उमा रविचंद्रन् यांच्या हस्ते गणेशोत्सवात भजन गाणार्या मुलींचा सत्कार करण्यात आला. सौ. उमा रविचंद्रन् यांची ओळख करून देतांना श्री. राधाकृष्णन् म्हणाले, ‘‘परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या कृपाशीर्वादाने सौ. रविचंद्रन् या गणेशोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत.’’ या वेळी शिवसेनेचे श्री. शंकरजी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनायक शानभाग आदी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एर्नाकुलम्(केरळ) येथील गणेशोत्सव मंडळात प्रवचन
एर्नाकुलम् (केरळ) : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील जय महाराष्ट्र गणेश मंडळात प्रवचन घेण्यात आले. या प्रवचनाचा १२० हून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला. या वेळी समितीच्या कु. प्रणिता सुखटणकर यांनी श्री गणेशचतुर्थी, तसेच ज्येष्ठ गौरी व्रत साजरे करण्यामागील महत्त्व विषद केले. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. अवनी लुकतुके यांनी समितीच्या कार्याची थोडक्यात ओळख करून दिली.
क्षणचित्रे
१. सनातन संस्थेच्या ग्रंथाचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
२. कुलदेवतेचा नामजप कसा करायचा, याविषयी अनेकांनी शंकानिरसन करून घेतले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात