Menu Close

३३ वर्षे फरार असणारा आणि ३९ महिलांचे लैंगिक शोषण करणारा मौलवी आफताब याला अटक

प्रयाग (उत्तरप्रदेश) : येथील पोलिसांनी मौलाना आफताब उपाख्य नाटे याला अटक केली आहे. तो १९८५ पासून फरार होता. त्याला एका हत्येच्या प्रकरणात शिक्षा झाली होती आणि तो जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर तो फरार झाला होता. गेल्या ३३ वर्षांत त्याने तोंडी तलाक पीडित ३९ मुसलमान महिलांचे निकाह हलालाच्या नावाखाली लैंगिक शोषण केले होते. नाटे ‘मौलाना करीम’ नावाने रहात होता. मुंबई, सूरत, अजमेर शरीफ आणि फरूखाबाद आदी शहरांतील मशिदी आणि मदरसे येथे लपून रहात होता. (गुन्हेगारांना आश्रय देणार्‍या मशिदी आणि मदरसे यांच्यावर कारवाई केली पाहिजेे ! अशा ठिकाणी आतंकवादीही लपून रहात असल्यास आश्‍चर्य वाटू नये ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) तो दर्ग्यामध्ये येणार्‍या लोकांना ‘मी भुतांचा त्रास दूर करतो’ असे सांगून लोकांकडून पैसे घेऊन त्यांना दोरे, तावित देत होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *