-
मध्यप्रदेशात ‘लव्ह जिहाद’चा धुमाकूळ !
-
इंदूरमध्ये मुलींना मैत्रीच्या जाळ्यात फसवणार्या युवकांची टोळी सक्रीय
हिंदूंनो, ‘लव्ह जिहाद’ कायमचे थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! अशा धर्मांधांना शिक्षा करण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी करा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
इंदूर (मध्यप्रदेश) : स्वत:चे नाव आणि धर्म पालटून हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवणार्या आसिफ या धर्मांधाला पोलिसांनी नुकतीच अटक केली. आसिफकडून बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड जप्त करण्यात आले आहेत. शाळा अन् महाविद्यालये येथील मुलींना मैत्रीच्या जाळ्यात फसवणार्या अशा युवकांची टोळी शहरात सक्रीय असल्याचे समोर आले आहे. टोळीतील अन्य आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. (‘लव्ह जिहाद’ उघडपणे चालू असतांना त्याच्या विरोधात काहीही न करणारे प्रशासन जनताद्रोहीच होत. आता हिंदु ‘शीला’चे रक्षण करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
पोलिसांच्या माहितीनुसार खजराना भागात नव्या-जुन्या चारचाकी वाहनांची खरेदी-विक्री करणार्या काही धर्मांध युवकांनी बनावट ओळखपत्रे सिद्ध करून ठेवली आहेत. या ओळखपत्रांद्वारे खोटे नाव आणि धर्म सांगून ते हिंदु मुलींना धोका देत आहेत. त्यांनी अशा मुलींशी वाईट संबंधही निर्माण केले आहेत. या टोळीत काही व्यायाम प्रशिक्षकही सहभागी आहेत. ते फेसबुकवरही हिंदु मुलींना बनावट नावाने ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ (मैत्रीसाठी विनंती) पाठवतात आणि ओळख वाढवून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात