इतकी प्रकरणे होत असतांना केरळ पोलीस काय करत होते ? न्यायालयाने एन्.आय.ए.कडे अन्वेषण दिले नसते, तर सत्य समोर आलेच नसते ! साम्यवादी पक्षाच्या राज्यांत लव्ह जिहाद करणे कायदेशीर आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
कोची (केरळ) : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर केरळ राज्यातील लव्ह जिहाद प्रकरणांची चौकशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (एन्.आय.ए.कडे) देण्यात आली आहे. एन्.आय.ए.ने आतापर्यंत केलेल्या चौकशीत आढळून आले की, हिंदु मुलींना लव्ह जिहादमध्ये अडकवून त्यांचे पद्धतशीर धर्मांतर चालू आहे. यामागे धर्मांधांच्या दवा पथक या संघटनेचा हात असून केवळ मागील वर्षीच ९८ हिंदु मुलींचे धर्मांतर झाले आहे.
१. एन्.आय.ए.च्या अधिकार्यांनी म्हटले की, केरळमध्ये लव्ह जिहादचा धोका निर्माण झाला आहे. एन्.आय.ए. अशा अनेक व्यक्तींच्या जबाबांची नोंद करत आहे की, ज्यांना लालूच दाखवून, प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे बलपूर्वक धर्मांतर केले गेले आहे.
२. एन्.आय.ए.चे असे म्हणणे आहे की, या कार्यासाठी धर्मांधांकडून दवा पथक म्हणून ओळखले जाणारे एक विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. ४ टप्प्यांत पार पडणारे लव्ह जिहादचे जाळे महाविद्यालयाच्या पातळीवर चालू होते. त्यात अनेक स्तरांचा समावेश आहे.
प्रथम अशा मुलीला गाठायचे, जिचे तिच्या आई-वडिलांसोबतचे संबंध तणावग्रस्त आहेत. मग दुसर्या टप्प्यात ते मुलीला इस्लाम धर्माविषयी माहिती देतात आणि पटवून सांगतात की, इस्लाममध्ये महिलांना अधिक स्वातंत्र्य आणि शांती मिळते. तिसरी पायरी म्हणजे त्यांना एका धर्मांतर केंद्रावर नेऊन ठेवणे. जेव्हा मुलगी घरी येत नाही, तेव्हा तिचे पालक हरवल्याची तक्रार दाखल करतात. पोलिसांचा तपास चालू झाल्याने मुलगी अधिक तणावग्रस्त बनते. आता अंतिम टप्पा येतो, तेव्हा ते त्या मुलीला सांगतात की, या गोंधळातून बाहेर येण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लग्न करणे आणि त्यासाठी धर्मांतर आवश्यक आहे.
३. एन्.आय.ए.ने सांगितले की, प्रत्येक प्रकरणात असाच घटनाक्रम लक्षात आला आहे. खूप अल्प प्रकरणे स्वेच्छिक आहेत. चौकशी चालूच राहिल्याने अजून अधिक प्रकरणे आमच्यासमोर आली आणि अजूनही येतील.
४. जेव्हा ४ टप्प्यांच्या प्रक्रियेकडे पाहिले, तेव्हा प्रथमदर्शनी त्यात काही अवैध असल्याचे दिसून येत नाही. कायद्यानुसार केवळ सक्तीच्या धर्मांतराला गुन्हा समाजाला जातो. तथापि एन्.आय.ए. पुराव्यांचे अनेक तुकडे जोडून त्यातून या कटाचा पडदा दूर सारेल. त्यासाठी पीडित मुलींचे जबाब साहाय्य करतील.
५. एन्.आय.ए.च्या अधिकार्यांनी म्हटले आहे की, केरळमध्ये अशा महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी सतत प्रयत्न केले जातात. हा प्रकार धार्मिक दुही पेरण्यासाठीच आहे हे केरळ राज्यामध्ये अतिशय स्पष्ट दिसून येते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात