पिंपरी : गणेशोत्सवाच्या काळातील १२ दिवसांमध्ये पिंपरी-चिंचवड येथील विविध घाटांवर ३० सहस्र ३६५ गणेशमूर्तींचे दान, तर २१ टन निर्माल्य जमा झाले. दान मूर्तींचे वाकड येथील दगडाच्या खाणीत विधिवत विसर्जन केल्याची माहिती संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड यांनी दिली. (पूजा केलेली मूर्ती फेकून देणे ‘विधीवत्’ कसे ? गणेशभक्तांनीच आता कृत्रिम हौदांतील गणेशमूर्तींचे काय होते, याचे वास्तव जाणून धर्मभावना दुखावणारे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासन आणि संस्कार प्रतिष्ठान यांना जाब विचारला पाहिजे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
निर्माल्य दान घेण्यासाठी डॉ. डी.वाय. पाटील फार्मसी कॉलेज, प्रतिभा महाविद्यालय, जनवादी महिला संघटना, टाटा मोटर्स, मोरया इन्स्टिट्यूट, जन आरोग्य अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, संस्कार- संस्कृती- सद्भावना महिला बचत गट, कमिन्स इंडिया लिमिटेड, सिंडिकेट बँक, गो-विज्ञान संशोधन संस्था आणि संस्कार प्रतिष्ठान आदींनी सहभाग घेतला होता. (वर्षभर नदी प्रदूषित होत असतांना या सामाजिक संस्था अशी मोहीम का राबवत नाही ? त्या वेळी त्या कोठे असतात ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात