Menu Close

धर्मशिक्षणवर्गात येणार्‍या धर्मप्रेमींकडून घाटकोपर येथील गणेशोत्सव मंडळात प्रवचनाचे आयोजन

डावीकडून सनातन संस्थेच्या सौ. विद्या सांगळे, डॉ. लक्ष्मण जठार यांचा सत्कार करतांना नारायण शेठ कंपाऊंड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. अजित खंडागळे

मुंबई : मुंबईतील घाटकोपर येथील काजू टेकडी परिसरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रत्येक शनिवारी धर्मशिक्षणवर्ग घेतला जातो. वर्गात येणार्‍या धर्मप्रेमी महिलांनी पुढाकार घेऊन येथील नारायण शेठ कंपाऊंड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये ‘सार्वजनिक गणेशोत्सवात काय असावे आणि काय नसावे’ या विषयावर प्रवचनाचे आयोजन केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे डॉ. लक्ष्मण जठार यांनी प्रबोधन केले. मंडळातील ५० गणेशभक्तांनी या प्रवचनाचा लाभ घेतला. या प्रवचनातून अत्यंत उपयुक्त ज्ञान मिळाल्याचे नारायण शेठ कंपाऊंड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. अजित खंडागळे यांनी या वेळी सांगितले. मंडळाच्या वतीने डॉ. लक्ष्मण जठार यांचा पुष्पहार आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *