Menu Close

टांझानिया (पूर्व आफ्रिका) येथे गणेशोत्सवानिमित्त लावण्यात आलेल्या फ्लेक्स प्रदर्शनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गणेशोत्सवात सहभागी झालेले अरूषा येथील गणेशभक्त

अरूषा, (टांझानिया, पूर्व आफ्रिका) : येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिर परिसरातील श्री हिंदु युनियनच्या सभागृहात अरुषा गणेशोत्सव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मशिक्षण आणि क्रांतीकारक यांचे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते. २५ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट २०१७ या कालावधीत या प्रदर्शनाचा ६०० हून अधिक भाविकांनी लाभ घेतला.

फ्लेक्स फलक पहातांना जिज्ञासू

प्रतिक्रिया

१. विदेशात जन्मलेल्या हिंदूंना आपल्या देवता आणि सण यांविषयी माहिती नसते, तुम्ही हे धर्मशिक्षण फलक लावून येथील लोकांपर्यंत चांगली माहिती पोहोचवण्याचे उत्तम कार्य केले आहे.- श्री. भद्रेश पंडित

२. आपल्या क्रांतीकारकांची माहिती देणारे फलक वाचून पुष्कळ अभिमान वाटला. – श्री. ऋषभ जैन

३. हिंदु संस्कृतीप्रमाणे प्रथम श्री गणेशपूजनाचे महत्त्व, आरती कशी करावी, कुलदेवतेच्या नामजपाचे महत्त्व, तसेच श्री दत्तगुरूंचे नामस्मरण का करावे ही सर्व माहिती वाचून योग्य मार्गाने साधना करण्याचे महत्त्व कळाले. – श्री. मिलन पंड्या

४. धर्मशिक्षण फलकांचे प्रदर्शन भरवून हिंदु धर्माविषयी ज्ञान देण्याचे आणि हिंदूंना जागृत करण्याचे जे कार्य सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती करत आहे, ते फारच उल्लेखनीय आहे. – श्री. गवाने

५. धर्मशिक्षण फलक वाचून पुष्कळ उपयुक्त माहिती मिळाली. – श्री. आनंद देशपांडे

क्षणचित्रे

१. धर्मशिक्षण फलकांची संगणकीय धारिका मागवून घेऊन अरूषा येथे त्यांची छपाई  करून घेण्यात आली. छपाईचा व्यय येथील भारतीय गणेशभक्तांनी मिळून केला.

२. या वेळी उपस्थित बहुसंख्य महिलांनी साडी परिधान केली होती, यावरून परदेशात राहूनही येथील भारतियांमध्ये आपल्या संस्कृतीविषयी असलेली अस्मिता अधोरेखित होत होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *