Menu Close

महाराष्ट्रामध्ये हिंदु जनजागृती सतिमीच्या वतीने राबवलेल्या आदर्श गणेशोत्सव मोहीमा

जिल्ह्यांत विविध ठिकाणी शौर्यजागरण नाटिका, फ्लेक्स प्रदर्शन आणि व्याख्याने यांना लक्षणीय प्रतिसाद

संभाजीनगर येथे हिंदु जनजागृती समितीची आदर्श गणेशोत्सव मोहीम

प्रात्यक्षिक दाखवतांना समितीचे कार्यकर्ते आणि उपस्थित भाविक

संभाजीनगर : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गणेशोत्सवाच्या कालावधीत शहर आणि झाल्टा, माहुली, अढूळ ही गावे येथील विविध गणेशोत्सव मंडळांत उत्सवांतील गैरप्रकार आणि आदर्श गणेश उत्सव आणि अन्य राष्ट्र अन् धर्म विषयांवरील व्याख्याने, शौर्यजागरण नाटिकेद्वारे स्वसंरक्षणप्रात्यक्षिके, तसेच फ्लेक्स प्रदर्शन, तसेच सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन यांचा लाभ  धर्माभिमानी आणि गणेशभक्त यांनी घेतला. शहरातील १८ ठिकाणी सामूहिक नामजपाचे आयोजन केले होते. समितीने आयोजिलेल्या आदर्श गणेशोत्सव मोहिमेमध्ये ३९ धर्मप्रेमी आणि वाचक यांनी सहभाग घेतला.

झाल्टा

१. येथील युवकांनी व्याख्यान आणि स्वसंरक्षण प्रात्यक्षिके यांच्या कार्यक्रमापूर्वी एकत्रितपणे गावात उत्साहपूर्ण घोषणा देऊन फेरी काढली.

२. प्रात्यक्षिके बघितल्यावर गावकर्‍यांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीर घेण्याची मागणी केली आणि प्रशिक्षणवर्गात येण्याची सिद्धता दर्शवली.

३. धर्मशिक्षणवर्गातील सर्वश्री विकास शिंदे, सचिन मुरदारे, ज्ञानेश्‍वर शिंदे, सुरासे, समाधान शिंदे आणि अन्य धर्माभिमानी यांनी स्वतः दायित्व घेऊन कार्यक्रमासाठी प्रयत्न केले.

अढूळ

१. येथे शौर्यजागरण नाटिकेचे आयोजन बजरंग गणेश मंडळ, शिवछत्रपती गणेश मंडळ आणि शिवशक्ती गणेश मंडळ यांनी संयुक्तरित्या केले.

२. नाटिका सादर होण्यासाठी धर्मशिक्षण वर्गातील सर्वश्री नारायण वाघ, नरेंद्र वाघ, आकाश पवार आणि अन्य धर्माभिमानी यांनी पुढाकार घेतला. हा उपक्रम पहाण्यासाठी गेवराई गावातील धर्मप्रेमीही उपस्थित होते.

माहुली

१. येथील शिवनिळकंठेश्‍वर मंदिर परिसरात निळकंठेश्‍वर गणेश मंडळाने लहान स्वरूपातील धर्मजागृती सभेचे आयोजन केले होते. गावातील धर्मप्रेमी श्री. विक्की लांडे यांच्या पुढाकाराने ही सभा आयोजित करण्यात आली होती.

२. सभेच्या वेळी प्रदर्शन लावण्याची सेवा गावातील आणि शनिशिंगणापूर येथील धर्मप्रेमी यांनी स्वतःहून सेवा केली.

कायगाव टोक येथे भाविकांनी केले वहात्या पाण्यात विधीवत् मूर्ती विसर्जन

जिल्ह्यातील कायगाव टोक येथे समितीचे कार्यकर्ते आणि गणेशभक्त यांनी मिळून  मूर्तीविसर्जन मोहीम राबवली. प्रतिवर्षी येथील श्री रामेश्‍वर मंदिराजवळ विसर्जन घाट असतांनाही भाविक त्या ठिकाणी असलेल्या पुलावरून गणेशमूर्ती खाली फेकून देत विसर्जन करतात; यंदाच्या वर्षी भाविकांचे प्रबोधन केल्यावर ६० टक्के भाविकांनी वहात्या पाण्यात विधिवत् मूर्ती विसर्जन केले. मोहिमेमध्ये नेवासा आणि देवगड येथील ७ धर्मप्रेमी सहभागी झाले होते. या मोहिमेत संभाजीनगर ग्रामीण पोलिसांचे चांगले सहकार्य लाभले.

काही मंडळांनी मात्र मोठ्या गणेशमूर्ती पुलावरून खाली नदीत फेकल्या. (यावरून हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची अपरिहार्यता लक्षात येते. – संपादक, दैनिक सनातन प्रभात )

अभिप्राय

१. आज तुम्ही इथे आहात, म्हणून पुष्कळ चांगले विसर्जन होऊ शकले. नाहीतर नुसता धिंगाणा असतो. निर्माल्याचे खचच साठतात आणि वाहतूककोंडी होते. या वेळी चांगले विसर्जन होते आहे.

२. हिंदूंच्या एवढ्या मोठ्या सणाविषयीही हिंदूंमध्ये जागृती करावी लागते, हे किती दुर्दैव आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात


ठाणे जिल्ह्यात हिंदु जनजागृती सतिमीच्या वतीने राबवलेली आदर्श गणेशोत्सव मोहीम

अंबरनाथ येथे विषय मांडतांना सौ. दीक्षा पेंडभाजे

ठाणे : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने समाजाला या मोहिमेच्या माध्यमातून धर्मशास्त्रांतर्गत काय योग्य आणि काय अयोग्य हे सांगितले गेले. श्री गणेशमूर्ती विसर्जनानंतर होणारी देवाची विटंबना रोखण्यासाठी मूर्तीदान करू नका, असे आवाहनदेखील समाजाला करण्यात आले.

कल्याण (प.) येथील महाजनवाडी सभागृहात समितीच्या वतीने घेतलेल्या एका उपक्रमात समितीच्या कार्यकर्त्या सौ. दीक्षा पेंडभाजे यांनी गणेशमूर्ती विसर्जनाची योग्य पद्धत या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा लाभ १०० जणांनी घेतला. दैनिक सनातन प्रभातचे वाचक सौ. कुंदा उगले यांनी पुढाकार घेऊन हा प्रवचनाचा कार्यक्रम ठेवला होता. राष्ट्र आणि धर्म विषयक प्रबोधनपर फ्लेक्स आणि ग्रंथ प्रदर्शन लावण्याचीही अनुमती त्यांनी दिली होती.

येथील लालचौकी भागातील निळकंठ व्हॅली येथे आदर्श गणेशोत्सव, गणेशोत्सवातील अपप्रकार आणि पर्यावरणपूरक मातीची मूर्ती या विषयावर सौ. दीक्षा पेंडभाजे यांनी विषय मांडला. या वसाहतीच्या गणेशोत्सव मंडळाने अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात विषय मांडण्यासाठी बोलावले होते. विषय सर्वांना पटला आणि अनेकांनी ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घेतला.

अंबरनाथ येथील नगरपालिका गणेशोत्सव मंडळाच्या वतीने हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी समितीच्या कार्यकर्त्या सौ. दीक्षा पेंडभाजे यांनी येथे आदर्श गणेशोत्सव आणि उत्सवातील विकृती याविषयावर प्रवचन घेतले.

कळवा

१. समितीच्या वतीने पारसिकनगर येथील अमृतांगण वसाहतीमध्ये समितीचे श्री. प्रशांत सुर्वे यांनी शौर्य जागरण हा विषय मांडला आणि तेथे स्वसंरक्षण प्रात्याक्षिके दाखवण्यात आली.

२. गावदेवीचा राजा आणि खारगाव येथील वक्रतुंड मंडळात धर्मशिक्षण देणारे फ्लेक्स लावण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात


मुलुंड येथील सार्वजनिक गणेशोत्सवात श्री गणेश या विषयावर प्रवचन

प्रवचन घेतांना उजवीकडे डॉ. लक्ष्मण जठार

मुंबई : मुलुंड पूर्व येथील साईनाथनगर मित्र मंडळाच्या सार्वजनिक श्री गणेशोत्सवात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री गणेश या विषयावर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. समितीचे डॉ. लक्ष्मण जठार यांनी श्री गणेशाविषयीचे अध्यात्मशास्त्र सांगितले. हिंदु धर्मियांमध्ये आपल्या देवतांप्रती आणि धर्माप्रती असलेली उदासीनता आणि त्यासाठी हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या कार्याविषयीही डॉ. जठार यांनी उपस्थितांना अवगत केले. प्रवचनातून उपयुक्त ज्ञान मिळाल्याचे साईनाथनगर मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. उत्तम शिंदे आणि अन्य कार्यकर्त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी डॉ. लक्ष्मण जठार यांना श्रीफळ देऊन समितीचे आभार मानण्यात केले.

क्षणचित्रे

१. या वेळी श्रीच्या मंडपात धर्मशिक्षणाचे फ्लेक्स लावण्यात आले होते.

२. नवरात्रीविषयी शास्त्रीय माहिती सांगणारे प्रवचन नवरात्रीच्या काळात आयोजित करण्यासाठी समितीला निमंत्रित करण्यात आले.

३. मंडळातील तरुण कार्यकर्त्यांसाठी शौर्यजागरण आणि धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात


हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथे श्री गणेश पूजनाचे अध्यात्मशास्त्र या विषयावरील प्रवचनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

श्री. सुभाष कागले यांच्या हस्ते श्री. किरण दुसे यांचा सत्कार

हुपरी : येथील त्रिमूर्ती गणेश मंडळ येथे श्री गणेश पूजनाचे अध्यात्मशास्त्र या विषयावर प्रवचनाचे आयोजन केले होते. प्रास्ताविक युवा सेना शहरप्रमुख श्री. विक्रम सावंत यांनी केले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रीतम पवार यांनी उपस्थितांना समितीच्या कार्याविषयी माहिती दिली. या प्रवचनात श्री गणेशाची पूजा करण्यामागील धार्मिक शास्त्र, श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यामागील शास्त्र या सूत्रांवर हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा लाभ १३० जिज्ञासूंनी घेतला.

कार्यक्रमाच्या शेवटी सामाजिक कार्यकर्ता श्री. उमेश दैने यांनी प्रवचनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर श्री. किरण दुसे यांचा सत्कार हुपरी येथील माजी सरपंच श्री. सुभाष कागले आणि श्री. प्रीतम पवार यांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ता श्री. दीपक गाट यांनी केला. या कार्यक्रमासाठी धर्मप्रेमी सर्वश्री शिवराज जाधव, शुभम दैने, पृथ्वीराज जाधव, प्रशांत सुतार, पोपट हांडे, प्रीतम गोंधळी यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या ठिकाणी सनातन-निर्मित सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन लावले होते. त्याला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद मिळाला.

रोटरी क्लबच्या कार्यकर्त्यांनी प्रवचन ऐकून स्वच्छ पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जन केले !

हुपरी येथे प्रवचन ऐकण्यासाठी आलेले रोटरी क्लबचे श्री. प्रदीप ठोंबरे आणि श्री. धनाजी देसाई यांना वहात्या पाण्यामध्ये श्रीगणेशमूर्ती विसर्जित करण्यामागील शास्त्र समजल्यावर त्यांनी येथील धर्मप्रेमी श्री. प्रवीण पाटील यांना गावातील त्यांच्या भागात सांडपाणी असलेल्या तलावात विसर्जन करण्यात येणार्‍या अडचणी सांगून त्याविषयी कसे करायचे, हे जिज्ञासूपणाने विचारले, तेव्हा श्री. प्रवीण पाटील यांनी हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांच्याशी चर्चा करून उपाययोजना जाणून घेतली. त्यानंतर दोन्ही धर्मप्रेमींनी त्यांच्या भागातील भाविकांच्या ३०० श्री गणेशमूर्ती एकत्र केल्या आणि ३ कि.मी. दूर असलेल्या स्वच्छ पाण्याच्या जलाशय (कॅनॉल) मध्ये त्याचे विसर्जन केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *