तस्लीमा नसरीन यांच्यासारखे परखड विचार देशातील एकतरी पुरो(अधो)गामी विचारवंत, लेखक मांडतात का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नवी देहली : रोहिंग्यांच्या प्रकरणी निर्वासित बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांनी एका ट्वीटद्वारे टीका केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘मुसलमान त्या मुसलमानांसाठी रडतात, जे मुसलमानेतरांच्या अत्याचाराला बळी पडतात; मात्र मुसलमान तेव्हा रडत नाहीत, जेव्हा मुसलमानच मुसलमानांवर अत्याचार करतात.’ तस्लीमा यांनी हे ट्वीट म्यानमारमध्ये रोहिंग्या आतंकवाद्यांच्या विरोधात होत असलेल्या सैनिकी कारवाईचा मुसलमानांकडून होत असलेला विरोध यावर असल्याचे म्हटले जात आहे. सिरीया, अफगाणिस्तान, पाकिस्तान या देशांमध्ये मुसलमांकडूनच होणार्या मुसलमानांवरील अत्याचारांवर मुसलमान गप्प रहातात, यावर त्यांनी ही टीका केली आहे. त्यांच्या या ट्वीटचे अनेकांनी समर्थन केले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात