Menu Close

बिहार : भाजपचे नेता विश्वेश्वर ओझा यांची अज्ञात हल्लेखोरांकडुन हत्या

पटणा : भाजपचे बिहारचे उपाध्यक्ष विश्वेश्वर ओझा यांची शुक्रवारी अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. एका लग्नसमारंभातून परतत असणाऱ्या ओझा यांच्यावर जवळून गोळीबार करण्यात आला.

भोजपूर जिल्ह्यातील सोनवर्षा आणि पारसौरा गावांदरम्यान ही घटना घडली. या गोळीबारात त्यांचा चालक व एक सहकारीही गंभीरपणे जखमी झाले. ओझा यांना शाहपूर येथील एका हॉस्पिटलात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. इतर दोघांवर उपचार सुरू असून त्यांच्या जिवाला धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

ओझा यांनी गेल्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शाहपूर येथून निवडणूक लढवली होती. मात्र ते पराभूत झाले होते.

संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *